कल्याण लोकसभा मतदारसंघ : वैशाली दरेकर देणार श्रीकांत शिंदेशी लढत?

वैशाली दरेकर यांनी शिवसेनेतून २००९ मध्ये मनसेत प्रवेश केला होता. कल्याण डोंबिवली पालिकेत २०१० मध्ये दरेकर मनसेच्या नगरसेविका होत्या. विरोधी पक्षनेते पद आणि महिला बालकल्याण समितीचे सभापती पद देखील दरेकर यांनी भूषविले होते.
कल्याण लोकसभा मतदारसंघ : वैशाली दरेकर देणार श्रीकांत शिंदेशी लढत?

डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेच्या माजी नगरसेविका वैशाली दरेकर-राणे यांना कल्याण लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बुधवारी उमेदवारी जाहीर केली. २००९ मध्ये दरेकर यांनी एक लाखापेक्षा अधिक मते मिळविली होती. आता यावेळी त्यांची लढत शिवसेना (शिंदे गट) चे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी होणार आहे.

वैशाली दरेकर यांनी शिवसेनेतून २००९ मध्ये मनसेत प्रवेश केला होता. कल्याण डोंबिवली पालिकेत २०१० मध्ये दरेकर मनसेच्या नगरसेविका होत्या. विरोधी पक्षनेते पद आणि महिला बालकल्याण समितीचे सभापती पद देखील दरेकर यांनी भूषविले होते. मनसेमध्ये त्यांनी प्रदेश पातळीपर्यंत काम केले होते. शिवसेना व मनसेमध्ये असताना अनेक आंदोलने, उपोषणांमध्ये त्या पुढे होत्या. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत वैशाली दरेकर यांनी शिवसेनेचे आनंद परांजपे यांच्या विरुध्द मनसेकडून निवडणूक लढविली होती. त्यांना तेव्हा एक लाख दोन हजार ८३ मते मिळाली होती.

logo
marathi.freepressjournal.in