कल्याणमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवसेनेचा वादग्रस्त देखावा; पोलिसांकडून देखावा काढण्यासाठी दबावतंत्र

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रामबाग विभागीय शाखेच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सवात दरवर्षी चालू घडामोडींवर भाष्य करणारे देखावे सादर कारण्यात येतात. या देखाव्यामुळे वाद निर्माण होत असल्याचे सांगत दरवर्षी पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. यावर्षी देखील काही व्यक्ती खंजीर पाठीत खुपसताना या देखाव्यात दाखविण्यात आले आहे.
कल्याणमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवसेनेचा वादग्रस्त देखावा; पोलिसांकडून देखावा काढण्यासाठी दबावतंत्र

कल्याण : गुरुवारी राज्यभरात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. कल्याणात दोन्ही शिवसेनेकडून मिरवणूक देखील काढण्यात आली. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्ररथ सादर करण्यात आले होते. मात्र कल्याणच्या रामबाग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेकडून शिवसेना उपनेते विजय साळवी यांच्या संकल्पनेतून एक वादग्रस्त चित्ररथ तयार करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त कल्याणच्या रामबागेत शिवशाहीमधील मावळे आणि लोकशाहीमधील मावळे हा देखावा साकारला. लोकशाहीत ज्यांनी घडवलं... त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे मावळे असा या देखाव्यात उल्लेख असून या देखाव्याला पोलिसांनी आक्षेप घेत हा देखावा काढण्यासाठी पोलिसांनी दबावतंत्र वापरले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रामबाग विभागीय शाखेच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सवात दरवर्षी चालू घडामोडींवर भाष्य करणारे देखावे सादर कारण्यात येतात. या देखाव्यामुळे वाद निर्माण होत असल्याचे सांगत दरवर्षी पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. यावर्षी देखील काही व्यक्ती खंजीर पाठीत खुपसताना या देखाव्यात दाखविण्यात आले आहे.

शिवाजी महाराजांनी रायगड बांधणीची जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांच्याकडे दिली होती. ज्यावेळी रायगड बांधून पूर्ण झाला तेव्हा गडाची उत्कृष्ट आणि भव्य बांधणी जी एखाद्या सिव्हिल इंजिनिअरला ही लाजवेल असे बांधकाम कौशल्य बघून महाराज खुश झाले. आणि त्यांनी हिरोजींना सांगितले की तू तुला हवे ते मागू शकतोस. तेंव्हा हिरोजींनी रायगडाच्या एका पायरीवर माझे नांव लिहिलेले असावे जेणेकरून आपले चरण त्या पायरीवर पडतील आणि मी धन्य होईन असे मागितले. असे होते.... शिवशाहीत ज्यांनी घडवलं... त्या राजाच्या पायाशी निष्ठा व्यक्त करणारे मावळे... असा उल्लेख या देखाव्यात करण्यात आला आहे.

तर शिवजयंतीनिमित्त केलेल्या देख्यावर पोलिसांनी अक्षेप घेतल्याबाबत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी तीव्र प्रतिक्रिया प्रसिद्धी माध्यामांना दिली की, आजच्या राजकारणात ज्या कार्यकर्त्यांना पक्षाने घडविले, मोठे केले त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. त्यांना वृद्धपकाळात वेदना दिल्या, असे मावळे लोकशाहीत जन्माला आलेले आहेत. लोकशाहीत नितीमत्ता राहिली नाही हे दाखविण्याचे काम शिवजयंतीनिमित्ताने साधले असल्याचे साळवी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in