Shrikant Shinde : संजय राऊतांना स्किझोफ्रेनियासारखा आजार झालाय का? श्रीकांत शिंदेंचा पलटवार

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदार श्रीकांत शिंदेंवर (Shrikant Shinde) केले होते गंभीर आरोप, त्यावर श्रीकांत शिंदेंनी केली टीका
Shrikant Shinde : संजय राऊतांना स्किझोफ्रेनियासारखा आजार झालाय का? श्रीकांत शिंदेंचा पलटवार

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. संजय राऊत म्हणाले होते की, श्रीकांत शिंदे यांनी मला जीवे मारण्याची सुपारी दिली होती, असा आरोप केला होता. यावर आता शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. "संजय राऊतांना स्किझोफ्रेनियासारखा आजार झालाय का?" असे म्हणत श्रीकांत शिंदेंनी पलटवार केला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, "सध्या संजय राऊत हे काल्पनिक गोष्टींमध्ये रमत आहेत. मला काळजी वाटते की, त्यांना सीजोफ्रेनियासारखा आजार झालाय का?" असा टोला त्यांनी यावेळी लगावला. ते म्हणाले की, "हा सगळा प्रकार हास्यास्पद आहे. राजा ठाकूर प्रकरणातील विद्याधर चिंदरकर यांचा जबाब सर्वांसमोर आला आहे. ते एकदा सांगतात जीवे मारण्याची धमकी मिळाली, तर दुसऱ्या दिवशी सांगतात तोंडाला काळे वगैरे फसणार आहेत म्हणून. त्यांच्या विधानांमध्ये किती तफावत आहे, हे समोर आलेच आहे. मला काळजी वाटते त्यांना स्क्रिझोफेनिया सारखा आजार झाला आहे की काय? एका काल्पनिक विश्वात ते राहत आहेत. महाराष्ट्रात सकाळची करमणूक होत असल्याने त्यांची गरज आहे." असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

logo
marathi.freepressjournal.in