अनधिकृत डिझेल चोरीप्रकरणी सहा आरोपी फरार; पोलिसांचा तपास सुरू

पेण तालुक्यातील तरणखोप परिसरात दोन जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास जवळपास पावणे दोन कोटी रुपयांचा डिझेल चोरीचा मुद्देमाल पकडण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले.
उल्हासनगरमधील डिस्प्ले बोर्डवर पॉर्न व्हिडिओ प्रसारित केला जातो; चौकशी सुरू आहे
उल्हासनगरमधील डिस्प्ले बोर्डवर पॉर्न व्हिडिओ प्रसारित केला जातो; चौकशी सुरू आहेप्रातिनिधिक छायाचित्र

पेण : पेण तालुक्यातील तरणखोप परिसरात दोन जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास जवळपास पावणे दोन कोटी रुपयांचा डिझेल चोरीचा मुद्देमाल पकडण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले. या प्रकरणातील नऊपैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अजूनही सहा आरोपी पेण पोलिसांच्या हाती न लागल्याने ते फरार असल्याचे सिद्ध होत आहे. मात्र त्याबाबत पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना विचारले असता सदर सहा आरोपींचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पेण तालुक्याला लागून असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याचे अनेक वेळा ऐकावयास मिळाले आहे. मात्र काही दिवसांपूर्वी पकडलेल्या कोट्यावधी रुपयांच्या डिझेलमुळे ही अवैध धंद्याची चर्चा नसून प्रत्यक्षात हे मोठ्या प्रमाणावर धंदे होत आहे हे सिद्ध झाले आहे. २ जानेवारी रोजी तरणखोप येथे पकडण्यात आलेल्या डिझेलच्या कारवाईत पोलिसांनी जहीर अहमद लब्बे, महम्मद अली अब्दुल वहाब आणि महम्मद रियाज महम्मद इदरिस अन्सारी या तिघांना ताब्यात घेतले, तर इश्तीयाक, राजू पंडीत, उस्मान, अब्दुल शेखसह सहा जण अजूनही फरार असल्याची महिती पेण पोलिसांनी दिली. या सर्व आरोपींवर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in