
शहापूर : शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेले सोनोग्राफी मशीन गेल्या आठ महिन्यांपासून बंद अवस्थेत पडून आहे. या रुग्णालयात सुविधांची वानवा आहे. सोनोग्राफी मशीन बंद असल्याने गर्भवतीची हेळसांड होत आहे. त्यामुळे खासगी सोनोग्राफी सेंटरवर जाण्याची वेळ आली आहे. त्यात खासगी केंद्रावरील खर्च सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर आहे. शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेले सोनोग्राफी मशीन चालवण्यासाठी सोनोग्राफी मशीन तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शहापूर या ठिकाणी असलेले १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आहे. तालुक्यातील अनेक गोरगरीब रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात.मात्र रुग्णालयातील सोनोग्राफी सुविधा गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे गर्भवतीसह पोटाचे विकार असणाऱ्या अन्य रुग्णांना खाजगी सोनोग्राफी सेंटरमध्येच धाव घ्यावी लागत आहे. याकडे शासनाचे अजिबात लक्ष नाही.
शहापूर उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी मशीन असून ती चालविण्यासाठी तंत्रज्ञ नाही, त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून सोनोग्राफी मशीन बंद आहे. यासाठी जिल्हा स्तरावर मागणी करण्यात आली आहे.
- डॉ.राजेंद्र पवार, प्रशासकीय अधिकारी