डोंबिवलीत चाकूने भोसकून हत्या

या प्रकरणी रितेश गायकर यांनी पोलीस ठाण्यात सुमन उमाशंकर यादव (बिहार) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला
डोंबिवलीत चाकूने भोसकून हत्या

डोंबिवली : भरदिवसा चाकूने भोसकून एकाची हत्या केल्याची घटना ८ तारखेला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील आडवली गावात मराठी शाळेच्या मागे पांडुरंग भाने चाळ येथे घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. बिगारी कामगार पुरविण्याच्या कारणावरून हि हत्या करण्यात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी रितेश गायकर यांनी पोलीस ठाण्यात सुमन उमाशंकर यादव (बिहार) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सरोज भिखारी सिंह यास शंकराचार्य कर्नाटक यांचे श्रीगेरी ट्रस्ट, आरटीपी हिंदी हायस्कूल जवळ दावडी, डोंबिवली पूर्व येथील बांधकाम साईटवर मजूर पुरविण्याच्या कारणावरून सुमन उमाशंकर यादव याने चाकूने छातीवर तीन ठिकाणी भोसकून जीवे ठार मारले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in