राज्य सरकार एआयद्वारे तरुणांना तयार करून देणार रिझ्युम

डिजिटल पद्धतीने तयार केलेले रेझ्युम महाराष्ट्रातील तरुणांना योग्य रोजगार देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील.
राज्य सरकार एआयद्वारे तरुणांना तयार करून देणार रिझ्युम

ठाणे : महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने एक उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) पुढाकार घेऊन एक लाख इतक्या नोकरी शोधणाऱ्यांचे बायोडेटा लिहिण्याचे आणि त्या बायोडेटा आरेखित करण्याचे काम केले जाईल.

राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ही कल्पना आहे. अनेकदा काय होते की, नोकरी शोधणाऱ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळत असल्या तरी दर्जेदार बायोडाटा नसल्यामुळे अनेक वेळा त्यांना पहिल्या टप्प्यावर अपयशाला सामोरे जावे लागते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तरुणांना डिजिटल रेझ्युम प्रदान करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला आहे," असे राज्य सरकारने निवेदनात म्हटले आहे.

या उपक्रमामुळे व्हॉट्सअॅपवरील ८६५५८२६६८४ या क्रमांकावर हाय पाठवून आणि काही सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन राज्यातील लाखो युवक अवघ्या काही मिनिटांत उच्च दर्जाचे आणि परिपूर्ण रिध्युम (स्वपरिचयपत्र) मिळवू शकतील. त्याचप्रमाणे राज्य सरकारतर्फे २८० रोजगार मेळावेही आयोजित केले जाणार आहेत. भविष्यातही असे रोजगार मेळावे आयोजित करण्याची योजना आहे. राज्यातील तरुण अशा रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन भरती प्रक्रियेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांच्याकडे चांगला बायोडाटा नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो, असे त्यात म्हटले आहे.

डिजिटल पद्धतीने तयार केलेले रेझ्युम महाराष्ट्रातील तरुणांना योग्य रोजगार देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील. या उपक्रमांतर्गत एक लाखाहून अधिक तरुणांना ही सेवा मिळू शकेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in