ठाण्यातील कशेळी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा आणि वैतरणा जलवाहिनीसह मुख्य जलवाहिनी ही ठाणे खाडीवरील कशेळी पुलावरून जात आहे.
ठाण्यातील कशेळी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा आणि वैतरणा जलवाहिनींसह मुख्य जलवाहिनी ही ठाणे खाडीवरील कशेळी पुलावरून जाते. भविष्यात या जलवाहिन्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या पुलाचे काम विशेष तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी ८० लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा आणि वैतरणा जलवाहिनीसह मुख्य जलवाहिनी ही ठाणे खाडीवरील कशेळी पुलावरून जात आहे. भविष्यात या जलवाहिन्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या पुलाचे काम विशेष तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक सल्लागार तसेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून ‘व्हीजेटीआय मुंबई’ची नेमणूक करण्यात आली आहे. दक्षिण कशेळी पुलावरील तीन जलवाहिन्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या पुलांची दुरुस्ती करणे, आवश्यक असल्यामुळे त्याकरिता दक्षिण कशेळी पुलाचे बांधकाम आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे खाडीवरील कशेळी पुलाच्या संरचनात्मक परीक्षण सल्लागार व दुरुस्तीच्या कामासाठी तांत्रिक सल्लागार तसेच प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून ‘व्हीजेटीआय मुंबई’ यांची नेमणूक करण्यात आली आहे.

जलवाहिन्यांचा देखील समावेश

ठाणे कशेळी ब्रिजवरून मुंबईला जाणाऱ्या जलवाहिन्यांद्वारे दरदिवशी सुमारे ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात जातो. या विविध आकाराच्या जलवाहिन्यांमधून हे पाणी मुंबईत आणले जात आहे. या जलवाहिन्यांचे पाणी काही लिटर्समध्ये ठाणे जिल्ह्यांतील तानसा येथील रहिवाशांना दिले जाते. या सर्व जलवाहिन्यांची दैनंदिन देखभाल आणि दुरुस्ती महापालिकेच्या माध्यमातून केली जात आहे. ठाणे खाडीवरील दक्षिण कशेळी पुलाच्या दोन्ही बाजूंना विविध आकाराच्या जलवाहिनी आहेत. त्यामध्ये तब्बल २,४०० मिलिमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी, १८०० मिलिमीटर व्यासाची वैतरणा जलवाहिनी आणि १८०० मिलिमीटर मुख्य जलवाहिनी यांचाही समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in