सबरजिस्ट्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कल्याण पूर्वेतील उपनिबंधक कार्यालयावर सापळा लावला असता या सापळ्यात घर नोंदणीसाठी १२ हजार रुपयांची लाच घेताना सबरजिस्ट्रार राज कोळी यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
सबरजिस्ट्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

कल्याण : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कल्याण पूर्वेतील उपनिबंधक कार्यालयावर सापळा लावला असता या सापळ्यात घर नोंदणीसाठी १२ हजार रुपयांची लाच घेताना सबरजिस्ट्रार राज कोळी यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे. अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नोंदणी कार्यालयाच्या उपनिबंधकाने तक्रारदाराकडे घराची नोंदणी करण्यासाठी २४ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ही रक्कम १२ हजार रुपये निश्चित करण्यात आली. रक्कम भरण्यापूर्वी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली होती. बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कल्याण पूर्वेकडील नोंदणी कार्यालयात सापळा रचून उपनिबंधक कोळी यांना १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. दरम्यान वृ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली.

logo
marathi.freepressjournal.in