मेट्रो कामादरम्यान ६५ फूट उंचीवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू, कंत्राटदाराला ५० लाख; तर सल्लागाराला ५ लाख दंड

मीरा–भाईंदर मेट्रो मार्गिका क्रमांक ९ वर काम करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे ४२ वर्षीय सुपरवायझरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली.
मेट्रो कामादरम्यान ६५ फूट उंचीवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू, कंत्राटदाराला ५० लाख; तर सल्लागाराला ५ लाख दंड
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

भाईंंदर : मीरा–भाईंदर मेट्रो मार्गिका क्रमांक ९ वर काम करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे ४२ वर्षीय सुपरवायझरचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १५ नोव्हेंबर रोजी घडली. सुरक्षा जाळी, सेफ्टी बेल्ट, जॅकेट किंवा हेल्मेट यांसारखी मूलभूत सुरक्षासाधने उपलब्ध करून न दिल्याने आणि त्यांचा वापर न झाल्याने फरहान तहजीब अहमद (४२) हे साईबाबानगर मेट्रो स्टेशनवर ६५ फूट उंचीवरून खाली पडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघातानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरक्षेतील गंभीर त्रुटी दाखवत खालील दंडात्मक कारवाई केली.

कंत्राटदार कंपनीवर ५० लाखांचा दंड तर सल्लागार कंपनीवर ५ लाखांचा दंड आणि मृतकाच्या कुटुंबाला तत्काळ ५ लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in