कळवा-डोंबिवली मेट्रोचे सर्वेक्षण करा;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एमएमआरडीएला सूचना

दिवा शिवसेना व धर्मवीर मित्र मंडळाच्या माध्यमातून केले गेल्याचे महोत्सवाचे संयोजक शिवसेना शहर प्रमुख माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी सांगितले
कळवा-डोंबिवली मेट्रोचे सर्वेक्षण करा;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एमएमआरडीएला सूचना

ठाणे : दिवा शहराच्या विकासासाठी जे जे करावे लागेल ते ते केले जाईल, मागील काही वर्षात दिवा शहराच्या विकासासाठी राज्य शासन, खासदार, डॉ. श्रीकांत शिंदे व महापालिका यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला असून अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत व काही विकास कामे सुरू आहेत. त्याचबरोबर कळवा-मुंब्रा-दिवा मार्गे डोंबिवली मेट्रोचे सर्वेक्षण करण्यासाठी एमएमआरडीएला सूचना देणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

दिवा शहरातील पाणी प्रश्न निकाली लावण्यासाठी अतिरिक्त दहा एमएलडी पाणी वाढवून दिले जाणार असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवा येथे आयोजित दिवा महोत्सव कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी व्यक्त केला. दिवा शिवसेना व धर्मवीर मित्र मंडळाच्या माध्यमातून केले गेल्याचे महोत्सवाचे संयोजक शिवसेना शहर प्रमुख माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी सांगितले. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

समारोपाच्या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवावासीयांच्या प्रेमाने मी भारावून गेलो असून दिवा शहरातून जे प्रेम मला मिळाले मिळते, ते मी कधीच विसरू शकणार नाही अशी भावना व्यक्त केली. दिवा शहराला सुद्धा मेट्रो मार्गाने जोडण्यात यावे, अशी मागणी रमाकांत मढवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवा मुंब्रा दिवा मार्गे डोंबिवली मेट्रोचे सर्वेक्षण करण्यासाठी एमएमआरडीएला सूचना देणार असल्याचे यावेळी जाहीर केले.

दिव्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

दिवा शहरातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे सांगत दिवा शहराच्या सर्वांगीण विकासाला आपला कायम पाठिंबा असेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दिवावासीयांना जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करत दिव्याचे डम्पिंग कायमचे बंद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी बंद केल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. दिवा शहरातील रस्ते झाले असून जे रस्ते व्हायचे शिल्लक आहेत तेही लवकर पूर्ण होतील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुंब्रा दिवा हा चुवा ब्रिज मार्गे येणारा रस्ता, दिवा शहरासाठी स्वतंत्र शासकीय रुग्णालय, स्वतंत्र पोलीस स्टेशन व दिवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या बाबीही लवकरच पूर्णत्वास जातील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in