बदलापूरमध्ये चार वर्षांच्या लहान मुलीवर झालेली अत्याचाराची घटना ही महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गंभीर प्रकरणाबाबत पोलीस आयुक्त डुंबरे यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली आहे. पीडित मुलींच्या पालकांची तक्रार न घेता, त्यांना ११ तास पोलीस स्थानकात बसवून ठेवले गेले. या प्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन करावे, ही मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
हे प्रकरण तीन महिन्यांत फास्ट ट्रॅकमध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.