कर्तव्यात कसूर पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगलट; एपीआयचं निलंबन, तर वरिष्ठ अधिकाऱ्याची पोलीस कंट्रोल रूममध्ये बदली

नियमाचं उल्लंघन करणाऱ्या 'पारो' बारवर स्थानिक कोनगाव पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) शशिकांत दोडके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांची ठाणे पोलीस कंट्रोल रूममध्ये तडकाफडकी बदली करण्यात आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

भिवंडी : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात एकीकडे बेकायदा बार, ढाबे , हुक्का पार्लरवर धडक कारवाई सुरू असतानाच, कल्याण - भिवंडी मार्गावरील रांजनोली गावाच्या हद्दीत असलेल्या 'पारो' ऑर्केस्ट्रा बार ॲन्ड रेस्टॉरंटच्या नावाखाली ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपड्यांवर बारबाला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत असतानाच ठाणे गुन्हे शाखेच्या ५ युनिटच्या पथकाने छापा टाकून बार मॅनेजर, ५ पुरुष वेटरसह १३ (बारबाला) महिला वेटर आणि ११ ग्राहक असे २९ जणांना ताब्यात घेतले; मात्र नियमाचं उल्लंघन करणाऱ्या 'पारो' बारवर स्थानिक कोनगाव पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) शशिकांत दोडके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांची ठाणे पोलीस कंट्रोल रूममध्ये तडकाफडकी बदली करण्यात आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण - भिवंडी मार्गवरील रांजनोली गावाच्या हद्दीत पारो बार आहे. या बारमध्ये शासनाच्या नियमाचं उल्लंघन करून बारबाला ग्राहकांशी उशिरापर्यत अश्लील चाळे करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे 'शाखेच्या ५ युनिटच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारवर ६ जुलै रोजी 'पारो ऑर्केस्ट्रा बार अँड रेस्टॉरंटच्या नावाखाली मॅनेजर, बारबाला आणि वेटर आदींनी आपसात संगनमत करून ग्राहकांच्या जवळ उभे राहून अंगावर रंगी बेरंगी पोशाखात तोकडे व अंग दर्शविणारे कपडे परीधान केले होते. शिवाय ग्राहकाच्या जवळ जावून दारूचा ग्लास भरून देवुन ग्राहकांना हेतु पुरस्सर अश्लील हावभाव करून ग्राहकांची नितीभ्रष्ट करीत असतांना ११ बारबाला मिळून आल्या असून, ग्राहकही महिला वेटर यांना हातवारे करून प्रोत्साहीत करीत होते. असे छापेमारीत पोलीस पथकाला आढळल्याने सर्वाना पोलिसांनी ताब्यात घेतले.

भिवंडीत २३च्या जवळपास ऑर्केस्टा बार

भिवंडी महापालिका हद्दीसह ग्रामीण भागातील मुंबई- नाशिक महामार्गावर व गोदामपट्यात सुमारे २३च्या जवळपास बार आहेत. त्यामध्ये लैला, देवदास, पारो, किनारा, सिंगर, लवली, बॉम्बे पेलेस, नाईट लव्हर्स, सपना अप्सरा, ड्रीम लव्हर्स, सम्राट, सुकुर, शिल्पा, सिल्वर पेलेस, इन्जोय, डब्लूडब्लूएफ, आशीर्वाद, सिरोज, संगीत आदी ऑर्केस्टा-डान्स बारचा समावेश आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी भिवंडीतील एका डान्स बारमधील बारबालवर पैश्याची उधळण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर उशिरापर्यत सुरू असलेल्या ऑर्केस्टा बारवर पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. तरी देखील पुन्हा उशिरापर्यत ऑर्केस्टा बार सुरू राहत असल्याचे ठाणे गुन्हे शाखेच्या ५ युनिटच्या पथकाने केलेल्या छापेमारीतून समोर आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in