स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माध्यमिक शाळेत लेझीम व ढोल ताशांच्या तालावर विद्यार्थ्यांचे स्वागत

विद्यार्थ्यांनी प्रथम शाळेला वाकून नमस्कार केला व शाळेच्या मैदानातून लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश केला
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माध्यमिक शाळेत लेझीम व ढोल ताशांच्या तालावर विद्यार्थ्यांचे स्वागत

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिला दिवशी शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची लागलेली ओढ व पालकांनाही कौतुक असते. डोंबिवलीमधील शैक्षणिक क्षेत्रातील नावाजलेल्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माध्यमिक शाळेत लेझीम व ढोल ताशांच्या तालावर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले होते.

प्रवेशद्वाराजवळ प्रथम शाळेतील ज्येष्ठ शिक्षक विठ्ठल बागल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलभा बोंडे व पर्यवेक्षिका जयश्री दौंड यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले. विद्यार्थ्यांनी प्रथम शाळेला वाकून नमस्कार केला व शाळेच्या मैदानातून लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश केला .यावेळी विद्यार्थ्यांच्या कपाळी गंधाचा टिळा लावून चॉकलेट व पेन देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी शिक्षक व कर्मचारीवर्ग यांचे उत्साही वातावरण होते. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर माध्यमिक शाळेचे प्रार्थना-परिपाठने शाळेचे कामकाज सुरू झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in