अधिकारी व ठेकेदारांच्या चुकीमुळे स्विमिंग पूल बंद!

जलतरण तलाव १० सप्टेंबरपासून खुला न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सरनाईक यांनी दिला
अधिकारी व ठेकेदारांच्या चुकीमुळे स्विमिंग पूल बंद!

ठाण्यातील लोकमान्य नगर येथील तरण तलाव गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. या संदर्भात अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी पत्रव्यवहार आणि आंदोलने केली होती, याच अनुषंगाने स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी लोकमान्यनगर येथील स्व. रामचंद्र ठाकुर जलतरण तलावाचा महानगरपालिकेतील सर्व संबंधित अधिकार्यांसह पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी महानगरपालिकेच्या बांधकाम खात्यातील काही अधिकारी व ठेकेदारांच्या चुकीमुळे जलतरण तलावाचा फिल्ट्रेशन प्लांट व क्लोरीन प्लांट चुकीच्या ठिकाणी व चुकीच्या पध्दतीने बसविला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दररोज स्विमिंग पूल चालू होण्यासाठी फिल्ट्रेशन प्लांट चालू केल्यानंतर पाणी स्वच्छ करण्याकरिता त्या ठिकाणी असलेली विद्युत मोटर सातत्याने जळत होती व त्यामुळे स्विमिंग पूल चालू करणे महानगरपालिकेला शक्य नव्हते. दरम्यान जलतरण तलाव १० सप्टेंबरपासून खुला न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सरनाईक यांनी दिला.

अधिकार्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे बंद असलेल्या स्विमिंग पुलाबाहेरील लाद्या व स्विमिंग पूलमधील टाईल्स पाहणी दरम्यान तुटलेल्या आढळल्या. याबाबत सरनाईक यांनी महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता महेश बर्हिराम व उपअभियंता चारुदत्त सरुळकर यांच्याशी संपर्क साधला.

यावेळी माजी नगरसेवक पुर्वश सरनाईक, नगरसेविका आशा डोंगरे, विभागप्रमुख रामचंद्र गुरव, उपविभागप्रमुख महेश लोखंडे, सामाजिक दिलीप केंजळे तसेच युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in