रिक्षाचालकाकडून टॅक्सीचालकाला मारहाण

कल्याण : क्षुल्लक कारणावरून रिक्षाचालकाने टॅक्सीचालकाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी कल्याणमधील पश्चिमेकडील स्टेशनबाहेर दुपारच्या दरम्यान घडली. याप्रकरणी हल्लेखोर रिक्षाचालकाविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षाचालकाकडून टॅक्सीचालकाला मारहाण
रिक्षाचालकाकडून टॅक्सीचालकाला मारहाणसंग्रहित छायाचित्र
Published on

कल्याण : क्षुल्लक कारणावरून रिक्षाचालकाने टॅक्सीचालकाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी कल्याणमधील पश्चिमेकडील स्टेशनबाहेर दुपारच्या दरम्यान घडली. याप्रकरणी हल्लेखोर रिक्षाचालकाविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद महमुद्दीन असे जखमी टॅक्सीचालकाचे नाव आहे. कल्याण पूर्वेकडील स्टेशनबाहेर टॅक्सीचालक सय्यद हे नेहमीप्रमाणे उभे असताना एका प्रवाशाने पुणे येथे जायचे असल्याने त्याने सय्यदला विचारणा केली. त्यावर सय्यदने होकार देत प्रवाशाला टॅक्सीत बसण्यास सांगितले. इतक्यात पाठीमागून एका रिक्षाचालकाने सय्यद याला थांबवले.

सय्यद यांच्याशी बाचाबाची करण्यास सुरुवात केली. प्रवाशाला पुणे येथे रिक्षाने नेणार का? असा प्रतिप्रश्न सय्यद यांनी केला असता संतापलेल्या रिक्षाचालकाने सय्यद यांना शिवागाळ करत मारहाण केली. यात सय्यद यांच्यात डोक्याला दुखापत झाली असून याप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in