कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड ; मध्य रेल्वेची लोकल सेवा २० ते २५ मिनीटे उशिराने

मुंबईत रेड अलर्ट तर ठाणे जिल्हात ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिकांनी विनाकारण घराबाहरे न पडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत
कल्याण स्थानकात तांत्रिक बिघाड ; मध्य रेल्वेची लोकल सेवा २० ते २५ मिनीटे उशिराने

राज्यातील अनेक भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालं आहे. अशात हवामान विभागाकडून मुंबईसह किनारपट्टीच्या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच मुंबईत रेड अलर्ट तर ठाणे जिल्हात ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिकांनी विनाकारण घराबाहरे न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत. अनेक कार्यालये तसंच शाळांना सुट्टी देखील जाहिर करण्यात आली आहे. अपातकालिन स्थितीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

अशात सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईतील कुलाबा परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर त्यापाठोपाट सीएसएमटी आणि नरिमन पॉईंट भागात जास्त पावसाची नोंद झाली आहे कुलाब्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चर्चगेट परिसर हा जलमय झाला असून मरीन लाईन ते चर्चगेट स्टेशन दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं असलं तरीही मध्य रेल्वेची वाहतूक धीमी असली तरी सुरु राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अशात कल्याण स्थानकात निर्माण झालेल्या तांत्रिक दोषांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वनेच्या अप-डाऊन मार्गावर कल्याण स्थानकात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे २०-२५ मिनीटे उशिराने धावत आहे. रेल्वे प्रशानसनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसंच मुंबईत देण्यात आलेल्या रेड अलर्टमुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनामाफर्त करण्यात आलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in