उद्घाटनावरून ठाकरे गट -भाजप आमनेसामने

उद्घाटनावरून ठाकरे गट -भाजप आमनेसामने

आदित्य ठाकरे यांच्या दिघा स्थानकातील दौऱ्यानंतर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्याचे नियोजित करण्यात आले
Published on

ठाणे : उबाठा गटाचे खासदार राजन विचारे यांच्या ठाणे लोकसभा मतदार संघात येत असलेल्या दिघा स्थानकाच्या उदघाटन पत्रिकेत विचारे यांचे नाव टाकण्यात न आल्याने एकीकडे ठाकरे गटात नाराजीचे वातावरण असताना स्वतः खा. विचारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधीच या स्थानकांचे उदघाटन करण्याचा प्रयत्न केला. ढोल ताशांच्या गजरात ठाकरे गटाचे कार्यकर्ते रेल्वे स्थानक परिसरात शिरले. या स्थानकाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने आधीच भाजपचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने दिघा रेल्वे स्थानकात काही काळ तणावाचे वातारण निर्माण झाले होते.

आदित्य ठाकरे यांच्या दिघा स्थानकातील दौऱ्यानंतर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्याचे नियोजित करण्यात आले होते; मात्र त्यापूर्वीच खा. राजन विचारे हे आपल्या कार्यकर्यांसह ढोल ताशांच्या गजरात दिघा रेल्वे स्थानक परिसरात घुसले आणि त्यांनी या रेल्वे स्थानकाचे उदघाटन करण्याचा प्रयत्न केला. भाजपचे कार्यकर्ते देखील यावेळी या स्थानकात उपस्थित असल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. दिघा रेल्वे स्थानकात मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता

logo
marathi.freepressjournal.in