Thane : घोडबंदर रोडवर दुचाकीने खांबाला दिलेल्या घडकेत 30 वर्षीय तरुण ठार ; दुचाकी देखील जळून खाक

मोटारसायकल एका खांबाला धडकल्याने 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अपघानंतर दुचाकीला आग लागली आहे.
Thane : घोडबंदर रोडवर दुचाकीने खांबाला दिलेल्या घडकेत 30 वर्षीय तरुण ठार ; दुचाकी देखील जळून खाक

ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर एक धक्कादायक घडली आहे. सोमवारी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मोटारसायकल एका खांबाला धडकल्याने 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अपघानंतर दुचाकीला आग लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोड भागातील हा तरुण आपल्या मोटारसायकलने घोडबंदर रोडवरून ठाण्याच्या दिशेने जात होता. यावेळी मेट्रो मार्गाच्या एका खांबावर त्याची मोटारसायकल आदळून तो खाली पडला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. खांबाला दिलेल्या जोरात धडकेमुळे मोटारसायकलला आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली.

या घटनेनंतर, स्थानिक अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून आग विझवली. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. गेल्या काही आठवड्यात ठाणे शहरामध्ये अश्या अपघाताचे प्रमाण वाढलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in