Thane : वायुसेना स्थानक परिसर फेरीवालामुक्त होणार; ना फेरीवाला क्षेत्र करण्याचा पालिकेचा निर्णय

ठाणे शहरातील कोलशेत परिसरात वायुसेनेचे महत्त्वाचे स्थानक आहे. संवेदनशील असलेल्या या परिसरात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्त्यावर चालणे देखील जिकरीचे झाले होते. कोलशेत भागातील वायुसेनेच्या स्थानकाजवळील अकबर कॅम्प परिसरातील रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे.
Thane : वायुसेना स्थानक परिसर फेरीवालामुक्त होणार; ना फेरीवाला क्षेत्र करण्याचा पालिकेचा निर्णय
Published on

ठाणे : ठाणे शहरातील कोलशेत परिसरात वायुसेनेचे महत्त्वाचे स्थानक आहे. संवेदनशील असलेल्या या परिसरात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्त्यावर चालणे देखील जिकरीचे झाले होते. कोलशेत भागातील वायुसेनेच्या स्थानकाजवळील अकबर कॅम्प परिसरातील रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. याठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे वाहतूककोंडी होत असून त्याचबरोबर या गाड्यांवरील ज्वालाग्राही उपकरणांमुळे स्फोट होऊन अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात होती. या संदर्भात वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेने आता कोलशेत रस्त्यावरील डी-मार्टपासून ते कोलशेत गाव आणि लोढा अमारा वाय जंक्शनपासून वायुसेनेच्या स्थानकापर्यंतच्या अकबर कॅम्प परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजू ना फेरीवाला क्षेत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा रस्ता फेरीवालामुक्त होण्याची चिन्हे आहेत.

घोडबंदर रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून ओळखले जाते. या मार्गावरून अनेक नागरिक प्रवास करतात. काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. घोडबंदरच्या मुख्य मार्गावर कोंडी होत आहे. ती टाळण्यासाठी अनेकजण कोलशेत मार्गाला पसंती देत प्रवास करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. त्यातच गेल्या काही वर्षांपासून डी-मार्टपासून ते कोलशेत गाव आणि लोढा अमारा वाय जंक्शनपासून वायुसेनेच्या स्थानकापर्यंतच्या अकबर कॅम्प परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूस फेरीवाल्यांनी ठाण मांडले होते. रस्त्यावर तसेच पदपथावर फेरीवाले गाड्या लावत असून यामध्ये खाद्य पदार्थांच्या गाड्यांसह पानटपऱ्यांचा समावेश आहे. पानटपऱ्या आणि खाद्य पदार्थ बनविणाऱ्या गाड्यांवर राजरोजसपणे गॅस आणि स्टोव्हसारखी उपकरणे वापरली जात असून या गाड्या रात्री उशीरापर्यंत सुरू असतात.

वायुसेनेच्या तक्रारीनंतर पालिकेला जाग

वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेने आता कोलशेत रस्त्यावरील डी-मार्टपासून ते कोलशेत गाव आणि लोढा अमारा वाय जंक्शनपासून वायुसेनेच्या स्थानकापर्यंतच्या अकबर कॅम्प परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजू ना फेरीवाला क्षेत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी नो पार्किंग क्षेत्र असे फलकही लावण्यात येणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावास प्रशाकीय सभेने मान्यता दिल्याने हा परिसर फेरीवालामुक्त होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

खाद्य पदार्थांच्या गाड्यांमुळे गर्दी

अकबर कॅम्प रोडला लागूनच भारतीय वायुसेनेचे स्थानक आहे. त्यामुळे हा परिसर अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात पानटपऱ्या आणि खाद्य पदार्थ विक्रीच्या गाड्यांमध्ये मोठी वाढ होत असून यामुळे सुरक्षिततेचा आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. याच परिसरात आयटीपार्क असून तेथील कर्मचारी या गाड्यांवर खाद्य पदार्थ खरेदीसाठी गर्दी करतात. या गाड्यांचा त्रास पादचारी आणि लोढा अमारा आणि लोढा स्टर्लिंग या गृहसंकुलातील नागरिकांना होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून कारवाई करण्याची मागणी होत होती.

logo
marathi.freepressjournal.in