ठाण्यात आघाडीचा निर्णय अंतिम टप्प्यात; काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचे प्रतिपादन

स्थानिक पातळीवर आघाडी करायची किंवा नाही, याचा निर्णय घेण्याचे अधिकार श्रेष्ठींनी स्थानिक नेत्यांना दिले आहेत. त्यानुसार ठाण्यात आघाडीचा निर्णय अंतिम टप्यात आला आहे. येत्या काही दिवसात आघाडीचे स्वरुप स्पष्ट होईल, असे सूतोवाच काँग्रेसचे नेते तथा मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले. उमेदवाराच्या जिंकण्याच्या निकषावरच आघाडीचे जागा वाटप होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात आघाडीचा निर्णय अंतिम टप्प्यात; काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचे प्रतिपादन
ठाण्यात आघाडीचा निर्णय अंतिम टप्प्यात; काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचे प्रतिपादनसंग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : स्थानिक पातळीवर आघाडी करायची किंवा नाही, याचा निर्णय घेण्याचे अधिकार श्रेष्ठींनी स्थानिक नेत्यांना दिले आहेत. त्यानुसार ठाण्यात आघाडीचा निर्णय अंतिम टप्यात आला आहे. येत्या काही दिवसात आघाडीचे स्वरुप स्पष्ट होईल, असे सूतोवाच काँग्रेसचे नेते तथा मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले. उमेदवाराच्या जिंकण्याच्या निकषावरच आघाडीचे जागा वाटप होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात गुरुवारी काँग्रेसच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम घेण्यात आला. येथील वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या मुलाखतींच्या वेळेस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राजेश जाधव, ठाण्यातील पक्षाचे प्रवक्ते आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दोन टप्यात १५० इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून, यावेळी पक्षाकडून प्रभावी कामगिरी होईल, असा दावाही त्यांनी केला. ठाणे महापालिकेच्या राजकारणात काँग्रेसचा सहभाग टाळून कोणतीही समीकरणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. सत्ताधाऱ्यांना ठाण्यातील मूलभूत प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे. सत्ताऱ्यांनी विकासाच्या घोषणा केल्या तरी प्रत्यक्षात ठाणेकरांना पाणीपुरवठा, वाहतूककोंडी, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत मतभेदांकडे लक्ष वेधत लोंढे यांनी सांगितले की, भाजप-शिवसेना युती जाहीर झाली तरी स्थानिक पातळीवर समन्वयाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. त्यामुळे ही युती निवडणुकीत कितपत टिकेल, याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. ठाणे महापालिकेत पारदर्शक कारभार, नागरिकांशी संवाद साधून निर्णय घेण्यावर काँग्रेसचा भर राहील, असा निर्धार व्यक्त करत ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारी आघाडीच आगामी निवडणुकीत सत्तेत येईल, असा विश्वास लोंढे यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in