ठाण्यात २ कोटी ७२ लाखांची 'व्हेल माशाची उलटी' जप्त

आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपयांची किंमत असलेली व्हेल माशाची उलटी (ॲम्बरग्रीस) विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना ठाणे गुन्हे शाखेच्या घटक-१ पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ किलो ७२० ग्रॅम अॅम्बरग्रीस जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत २ कोटी ७२ लाख रुपये आहे.
ठाण्यात २ कोटी ७२ लाखांची 'व्हेल माशाची उलटी' जप्त
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

ठाणे : आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधी रुपयांची किंमत असलेली व्हेल माशाची उलटी (ॲम्बरग्रीस) विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांना ठाणे गुन्हे शाखेच्या घटक-१ पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ किलो ७२० ग्रॅम अॅम्बरग्रीस जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत २ कोटी ७२ लाख रुपये आहे. या ॲम्बरग्रीसचे कनेक्शन कणकवलीशी असल्याचे तपासात समोर आले आहे.

गुन्हे शाखेचे हवालदार गणेश बडगुजर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने सोमवारी (५ ऑक्टोबर) रात्री जांभळी नाका येथील हायलॅन्ड रेसिडेन्सी लॉजजवळ सापळा रचला. रात्री साडेसातच्या सुमारास कोल्हापूर येथील मयुर विश्वास पाटील आणि सिंधुदुर्ग येथील मिनाक्षी मधुकर मोहिते हे दोघे संशयास्पदरीत्या आढळले.

ॲम्बरग्रीसचा वापर उच्च दर्जाचे अत्तर आणि सुगंधी द्रव्यांच्या निर्मितीत केला जातो. दोघांनी विनापरवाना विक्रीच्या उद्देशाने ते जवळ बाळगल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष मोरे करीत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in