भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेच्या माजी सहाय्यक आयुक्तांविरोधात महिलेची लैंगिक अत्याचाराची तक्रार

राज्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला ठाणे कनेक्शन उघड झाले असून, ठाणे महापालिकेचे वादग्रस्त माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचाराची गंभीर तक्रार दाखल केली आहे.
भोंदू अशोक खरात
भोंदू अशोक खरातसंग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : राज्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला ठाणे कनेक्शन उघड झाले असून, ठाणे महापालिकेचे वादग्रस्त माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचाराची गंभीर तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार कासारवडवली पोलीस ठाणे येथे नोंदवण्यात आली आहे.

शीतपेयामध्ये गुंगीचं औषध देऊन अत्याचाराचा आरोप

तक्रारीनुसार, २०२० ते २०२३ या कालावधीत घोडबंदर परिसरातील एका गृहसंकुलातील फ्लॅटमध्ये संबंधित महिलेला शीतपेयामध्ये गुंगी आणणारे पदार्थ देऊन आहेर यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच या प्रकाराचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचेही महिलेने नमूद केले आहे. याशिवाय, नौपाडा परिसरातील एका ठिकाणीही तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून, आहेर यांनी संबंधित महिलेला नाशिक येथे अशोक खरात यांच्या कार्यालयात नेल्याचा आरोप आहे. त्यांनी खरात यांची ओळख ज्योतिषी म्हणून करून दिली होती. त्या ठिकाणी खरात यांनी काही धार्मिक विधी केल्याचा तसेच तिला एक दगड (मोती) गळ्यात घालण्यास दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

महेश आहेर हे ठाणे महापालिकेतून निवृत्त झालेले अधिकारी असून, काही वर्षांपूर्वी एका वादग्रस्त घटनेत त्यांच्यावर मारहाण झाल्याचीही नोंद आहे. त्या प्रकरणात त्यांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या सर्व आरोपांबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

आहेर हे निवृत्त अधिकारी असून, काही वर्षांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर मारहाण झाल्याची घटना देखील चर्चेत आली होती. सध्या या सर्व आरोपांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in