Thane : ठाण्यामध्ये भाजप कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद

ठाण्यातील (Thane) वर्तक नगर भागात भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय बिस्वाल यांचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
Thane : ठाण्यामध्ये भाजप कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद

ठाण्यातील (Thane) वर्तक नगरमधील महात्मा फुलेनगर भागात भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय बिस्वाल यांचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मंगळवारी घडली असून ही घटना घडली त्यावेळेस कार्यालयात कोणीही नव्हते, असे धनंजय बिस्वाल यांनी सांगितले. या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वर्तक नगरच्या महात्मा फुलेनगर भागात धनंजय बिस्वाल हे राहत असून ते ठाणे शहरात भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. या परिसरात त्यांचे एकमजली घर आहे. महिन्याभरापूर्वी त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावर भाजपचे कार्यालय सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी धुलिवंदनानिमित्ताने ते घरात असताना पहाटे ५च्या दरम्याने सुमारास अचानक कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फुटल्याचा आवाज झाला. त्यामुळे ते कार्यालयात घुसले तेव्हा एक व्यक्ती त्यांच्या कार्यालयामध्ये राॅकेल पसरवत होता. बिस्वाल यांना बघताच त्याने पळ काढला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. याप्रकरणी त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in