भिवंडीतून ४ बांगलादेशी तरुणांना अटक

भिवंडीतून ४ बांगलादेशी तरुणांना अटक

बांगलादेशातून छुप्या मार्गाने येवून भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशी तरुणांना नारपोली पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

बांगलादेशातून छुप्या मार्गाने येवून भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशी तरुणांना नारपोली पोलिसांनी भिवंडी शहरातील दापोडा येथील पारसनाथ कंपाऊंडमध्ये सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. मोहम्मद जियाउल हक (२९),अबु सुफियान कबीर शेख (२२),अबू मोसा कबीर शेख (१९),मोहमद अफसर शेख(२६) असे गजाआड करण्यात आलेल्या बांगलादेशी तरूणांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही बांगलादेशी तरुण गेली अनेक वर्षांपासून भिवंडीत वास्तव्यास असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

नारपोली पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई योगेश क्षीरसागर आणि मयूर शिरसाठ यांना बांगलादेशी तरुणांची गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळताच,त्याअनुषंगाने पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या आदेशानुसार नारपोली पोलीस ठाण्याचे वपोनि मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार यांनी पोलीस पथकासह १३ एप्रिल रोजी पारसनाथ कंपाऊंडमध्ये सापळा रचून चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, अनेक वर्षांपासून भिवंडीत राहत असल्याचे समोर आल्याने त्यांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

अटक केलेल्या चारही बांगलादेशी तरुणांकडे भारताचा अधिकृत पारपत्र किंवा भारत देश किंवा बांगलादेशाचा विजा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने छुप्या मार्गाने दलालाच्या मदतीने बांगलादेशातून भिवंडीत येवून अनधिकृतपणे वास्तव्यास राहत असल्याची प्रथम दर्शनी तपासात आढळून आले आहे. शिवाय अटक बांगलादेशी तरुणाकडे आधारकार्ड, पॅन कार्ड बनावट असल्याचे उघडकीस आले आहे.दरम्यान, चारही अटक बांगलादेशी तरुणांना न्यायायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in