ठाणे कोस्टल रोडमुळे ६८० कांदळवनांना धोका; नॅटकनेक्ट फाऊंडेशनचा पुनर्विचाराचा इशारा

आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या रामसर स्थळाचा दर्जा लाभलेल्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यातील कांदळवनांना प्रस्तावित ठाणे कोस्टल रोड-२ प्रकल्पामुळे धोका निर्माण झाला आहे. या प्रकल्पामुळे सुमारे १.७हेक्टर क्षेत्रातील अंदाजे ६८० परिपक्व कांदळवनांचे नुकसान होण्याची शक्यता असून, हा प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने पुनर्विचार करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
ठाणे कोस्टल रोडमुळे ६८० कांदळवनांना धोका; नॅटकनेक्ट फाऊंडेशनचा पुनर्विचाराचा इशारा
ठाणे कोस्टल रोडमुळे ६८० कांदळवनांना धोका; नॅटकनेक्ट फाऊंडेशनचा पुनर्विचाराचा इशाराप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

उरण : आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या रामसर स्थळाचा दर्जा लाभलेल्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यातील कांदळवनांना प्रस्तावित ठाणे कोस्टल रोड-२ प्रकल्पामुळे धोका निर्माण झाला आहे. या प्रकल्पामुळे सुमारे १.७हेक्टर क्षेत्रातील अंदाजे ६८० परिपक्व कांदळवनांचे नुकसान होण्याची शक्यता असून, हा प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने पुनर्विचार करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. नॅटकनेक्ट फाऊंडेशनने यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी कांदळवनांच्या संभाव्य नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली. रामसर स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतरही संबंधित पाणथळ क्षेत्राचे प्रत्यक्ष संरक्षण होत नसेल, तर या मान्यतेचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संरक्षित पाणथळ क्षेत्रांचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे प्रभावी संरक्षण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रस्तावित ७.१२९ किलोमीटर लांबीचा ठाणे कोस्टल रोड-२ मुलुंड पूर्वेकडील आनंदनगरला ठाण्यातील बाळकुमशी जोडणार आहे. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने या प्रकल्पाची पुढील मंजुरीसाठी शिफारस केल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने रस्त्याच्या मार्गरषेचा नव्याने अभ्यास करावा आणि कांदळवनांचे नुकसान टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा सखोल विचार करावा, अशी मागणी नॅटकनेक्टने केली आहे.

'सागर शक्ती'चे संचालक नंदकुमार पवार यांनीही कांदळवनांच्या संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. कांदळवने किनाऱ्याची धूप रोखतात, लाटांची ऊर्जा कमी करतात आणि सागरी जीवसृष्टीसह वन्यजीवांना अधिवास उपलब्ध करून देतात.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in