ठाणे खाडीकिनारा मार्गातील अडथळे दूर; कोस्टल रोडच्या सर्व परवानग्या मंजूर

बाळकुम ते गायमुख या खाडीकिनारी कोस्टल रोड मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून, या मार्गाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : बाळकुम ते गायमुख या खाडीकिनारी कोस्टल रोड मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून, या मार्गाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घोडबंदर परिसरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा पर्याय ठरणार असल्याचा विश्वास ठाणे महापालिकेने व्यक्त केला आहे.

घोडबंदर भागात दररोज वाढणारी वाहतूक लक्षात घेता "ठाणे कोस्टल रोड" या प्रकल्पाचा बाळकुम ते गायमुख खाडीकिनारी टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या प्रकल्पासाठी प्रदूषण नियंत्रण विभागासह वनविभाग, सीआरझेड, वायुदल आणि केंद्रीय पर्यावरण विभागाच्या परवानग्या आवश्यक होत्या. महापालिकेने या सर्व परवानग्या नुकत्याच प्राप्त केल्या असून, त्याची माहिती आता उच्च न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर कोस्टल रोडच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल.

ठेकेदारही निश्चित

गायमुख ते खारेगाव या १३.४५ किमी लांबीच्या आणि ४० ते ४५ मीटर रुंदीच्या कोस्टल रोडसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. या कामाचा अंदाजे खर्च १२०० कोटी रुपये असून, एमएमआरडीएकडून अर्थसहाय्य मिळणार आहे. त्यानंतर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने सुधारीत आराखडा सादर केल्यानंतर हा खर्च वाढून २७२७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.

logo
marathi.freepressjournal.in