ठाण्यात रंगणार दहीहंडीचा जल्लोष; १६ ऑगस्टला दिमाखदार पारंपरिक उत्सव

धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाका येथील दहीहंडी उत्सवाने ठाण्यातील पारंपरिक जल्लोषाला नवे पर्व दिले आहे. याच परंपरेत यंदा शनिवार, १६ ऑगस्ट रोजी थरांचा थरार, ‘गोविंदा रे गोपाळ’च्या जयघोषासह मान्यवरांची उपस्थिती, गीत-संगीताचा जल्लोष आणि भगव्याचा रंगारंग सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाका येथील दहीहंडी उत्सवाने ठाण्यातील पारंपरिक जल्लोषाला नवे पर्व दिले आहे. याच परंपरेत यंदा शनिवार, १६ ऑगस्ट रोजी थरांचा थरार, ‘गोविंदा रे गोपाळ’च्या जयघोषासह मान्यवरांची उपस्थिती, गीत-संगीताचा जल्लोष आणि भगव्याचा रंगारंग सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगणार आहे.

मुंबईतील दहीहंडीचा उत्साह ठाण्यात आणण्याचा संकल्प धर्मवीर दिघे यांनी केला होता. दिमाखदार सोहळा, मराठमोळा साज, आकर्षक बक्षिसे आणि जोशपूर्ण वातावरणामुळे टेंभीनाका हंडी ठाण्याची ‘मानाची हंडी’ म्हणून ओळखली जाते.

महोत्सवात नामवंत गायक, मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच मालिकांतील लोकप्रिय कलाकारांचा सहभाग असेल. सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञीच्या नृत्याविष्कारासह रंगतदार गाणी, जोशपूर्ण नृत्य आणि नेत्रदीपक रोषणाईमुळे हा जल्लोष अधिक खुलणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत पवार (शिवसेना ठाणे शहर विधानसभा प्रमुख), टेंभीनाका मित्रमंडळ, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह सर्व पदाधिकारी मेहनत घेत असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले आहे.

६,६५२ गोविंदांना विमा संरक्षण

वसई : दि. १६ ऑगस्ट रोजी दहीहंडी (गोपाळकाला) उत्सव साजरा होत असून दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या गोविंदा पथकातील गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महानगरपालिका क्रीडा विभागामार्फत गोविंदांना दहीहंडी उत्सवादरम्यान विमा संरक्षण देण्यात आला आहे. यावर्षी शहरातील एकूण ९९ गोविंदा पथकांतील ६,६५२ गोविंदांचा मे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत विमा काढण्यात आला.

ठाणे महापालिकेने मंडप परवानगीची प्रक्रिया सुकर करण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. परंतु त्या सेवेकडे मंडळांनी काहीशी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. महापालिकेने सुरू केलेल्या या पद्धतीमध्ये ९ प्रभाग समितीमधून अवघे ४ अर्ज प्राप्त झाले आहेत, तर ऑफलाइनमध्ये तब्बल ३४ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती महापालिकेने दिली. मंडळांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी राहू नयेत, यासाठी ऑनलाइन पद्धत देखील सुरू करण्यात आली आहे.

शंकर पाटोळे, उपायुक्त, ठामपा

१ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक

मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी १,००,०००/- रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे, तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी १० हजार, सहा थरांसाठी ७ हजार, पाच थरांसाठी ५ हजार, तर चार थरांसाठी ४ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

३८ अर्ज प्राप्त

लाखो रुपयांच्या बक्षिसाचे लोणी चाखायला मिळत असल्यामुळे मुंबईनंतर गेल्या काही वर्षांत ठाण्यात गोविंदा पथकांची पावले वळतात. ठाणे हे गोविंदांची पंढरी म्हणून ओळखले जाते. त्यात यंदा निवडणुकीचा काळ असल्याने या वर्षीच्या दहीहांडी उत्सवांना अधिकचे महत्व प्राप्त झाले आहे. ठाणे महापालिका हद्दीत विविध प्रभाग समितींमधून महापालिकेला आतापर्यंत ३८ अर्ज प्राप्त झाले आहे.

साइड मंडपासाठी २१ मंडळांना परवानगी

ठाणे : दहीहंडी उत्सवाची तयारी जोरात सुरू असून गोविंदा पथकांची देखील सरावासाठी लगबग वाढली आहे. तिकडे राजकीय मंडळींकडून हा उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. अशातच ठाण्यात दहीहंडी उभारताना त्याच्या बाजूला मंडप उभारणीसाठी महापालिकेकडे अर्ज दाखल होऊ लागले आहेत. त्यानुसार आतापर्यंत ३८ मंडळांचे अर्ज महापालिकेला प्राप्त झाले असून त्यातील २१ मंडळांना महापालिकेने मंडप उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. यात सर्वाधिक १० अर्ज वर्तकनगर प्रभाग समितीत आले आहेत.

महानगरपालिकेचे आवाहन

सदर विमा हा अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून ते दि. १७ ऑगस्ट सकाळी ०६.०० पर्यंत लागू राहील. तथापि गोविंदांना विमा संरक्षण मिळाले असले तरी उत्सवाच्या ठिकाणी दहीहंडी उत्सव आयोजकांनी गोविंदांच्या सुरक्षेच्या सर्व उपाययोजना कराव्यात, कोणालाही दुखापत होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in