विशेष मतदारांसाठी ठाणे जिल्ह्याचा पुढाकार; ८५ वर्षांवरील ५९ हजार चार मतदारांची नोंद

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४० टक्के अपंगत्व व ८५ वर्षे वयावरील वृध्द यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत १२ डी नमुना फॉर्म भरून घरूनच मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र...
विशेष मतदारांसाठी ठाणे जिल्ह्याचा पुढाकार; ८५ वर्षांवरील ५९ हजार चार मतदारांची नोंद

ठाणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४० टक्के अपंगत्व व ८५ वर्षे वयावरील वृध्द यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत १२ डी नमुना फॉर्म भरून घरूनच मतदान करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र ही बाब अनिवार्य नसून अधिकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देत मतदारांची संख्या वाढविण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून विशेष पुढाकार घेण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे इच्छुक मतदारांनी १२ डी फॉर्म पाच दिवसात भरून द्यायचे आहेत. त्यापैकी पात्र मतदारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देतील.

ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण ८५ वर्षांवरील ५९ हजार चार मतदार आहेत. जे मतदार त्यांच्या वृद्धत्व व अंपगत्त्व यामुळे मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकत नाही, त्यांच्याकरिता ही सुविधा आहे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, हा यामागील भारत निवडणूक आयोगाचा उद्देश आहे.

ठाणे जिल्ह्यातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षे व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या ३१,१८६ आणि महिला मतदारांची संख्या २७,८१९ असे ५९००४ इतकी आहे.

- अर्चना कदम,अधिकारी, ठाणे उप जिल्हा निवडणूक

मतदारसंघ पुरुष महिला एकूण

भिवंडी ग्रामीण १०५० १५३१ २५८१

शहापूर १५०८ २००३ ३५११

भिवंडी पश्चिम ११६२ १११८ २२८०

भिवंडी पूर्व ३६३ ३३७ ७००

कल्याण पश्चिम २०१४ १६२३ ३६३७

मुरबाड २११ २२८५ ४३९६

अंबरनाथ १६४५ १३९८ ३०४३

उल्हासनगर १०३७ १०४९ २०८६

कल्याण पूर्व १०६६ ९६४ २०३०

डोंबिवली २६३४ १,९३४ ४५६८

कल्याण ग्रामीण १५७५ १२७२ २८४७

मीरा-भाईंदर २६४० २४१० ५०५०

ओवळा-माजिवडा २१६४ १५७२ ३७३६

कोपरी-पाचपाखाडी १४६१ १२६५ २७२६

ठाणे २८१७ २४५० ५२६७

मुंब्रा-कळवा १९९९ १६२० ३६१९

ऐरोली १३४३ ११३४ २४७७

बेलापूर २५९७ १८५३ ४४५०

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in