ठाणे : अवकाळी पावसामुळे साथीच्या रोगांचे संकट

अचानक आलेल्या पावसाने आता नवीनच समस्या निर्माण होण्याची शक्यता असून शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ठाणे : अवकाळी पावसामुळे साथीच्या रोगांचे संकट
Published on

ठाणे : मागील दोन दिवसांपासून ठाणे शहराला अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. अचानक आलेल्या पावसाने आता नवीनच समस्या निर्माण होण्याची शक्यता असून शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंगळवारी रात्रीपासून ठाणे शहरात वादळी वाऱ्यांसह सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शहरात गारवा निर्माण केला असला, तरी या पावसामुळे संभाव्य साथीच्या आजारांचे संकट उभे राहिले आहे. उन्हाच्या झळांमध्ये हा पाऊस काहीसा सुखावणारा वाटला, मात्र याच पावसामुळे ‘अवकाळी आजारांचे’ संकट गडद झाले आहे. परिणामी, ठाणे जिल्हा आरोग्य विभाग आणि सामान्य रुग्णालय प्रशासन सज्ज झाले आहे.

बदलत्या वातावरणामुळे व्हायरल आजार
सर्दी, खोकला व घसा बसणे, उलट्या आणि जुलाब (गॅस्ट्रो), घामोळ्या व त्वचाविकार डोळ्यांची जळजळ व श्वसनाचे त्रास व दम लागणे आदी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी केवळ उकळलेले आणि फिल्टर केलेले पाणीच प्यावे, वेळेवर व सकस जेवण घ्यावे, फ्रीजमधील शिळे अन्न किंवा थंड पेये टाळावीत, आजाराची कोणती लक्षणे आढळली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गेल्या काही आठवड्यांपासून तापमानात झपाट्याने वाढ झाली होती. त्यातच अवकाळी पावसामुळे जमिनीवर पाणी साचले होते तसेच तापमान वाढीमुळे वातावरणात दमटपणा निर्माण झाला आहे. हीच आर्द्रता म्हणजे विविध विषाणूंसाठी योग्य वातावरण असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक गारवा निर्माण होतो आणि त्यानंतर उष्णता वाढते. या बदलामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि विषाणूजन्य आजारांना चालना मिळत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in