२५ हजारांच्या लाचप्रकरणी वनपाल-वनरक्षक जेरबंद; दोन दिवसांची पोलीस कोठडी

मोरपीस विक्री करताना पकडल्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि जप्त केलेली मोरपीस परत करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी करत, तडजोडीअंती ठरलेले २५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ठाणे वनविभागाचे वनपाल नीलेश सीताराम श्रावणे (४७) आणि वनरक्षक मच्छिंद्र प्रकाश सोनटक्के (२५) या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.
२५ हजारांच्या लाचप्रकरणी वनपाल-वनरक्षक जेरबंद; दोन दिवसांची पोलीस कोठडी
Published on

ठाणे : मोरपीस विक्री करताना पकडल्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि जप्त केलेली मोरपीस परत करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी करत, तडजोडीअंती ठरलेले २५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ठाणे वनविभागाचे वनपाल नीलेश सीताराम श्रावणे (४७) आणि वनरक्षक मच्छिंद्र प्रकाश सोनटक्के (२५) या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली असून याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या दोघांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आले दिले आहेत.

२५ वर्षीय तक्रारदार यांच्या भाऊ आणि ओळखीच्या लोकांना मोरपिस विक्री करताना, ठाणे वनपाल श्रावणे यांनी कारवाई करत ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल न

करण्याकरिता व जप्त केलेली मोरपीस परत करण्याकरिता श्रावणे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी केली होती. याचदरम्यान तक्रारदारांनी ठाणे एसीबी कार्यालयात धाव घेत, तक्रार दिली होती.

त्या अनुषंगाने २६ ऑगस्ट रोजी केलेल्या पडताळणी श्रावणे यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोडीअंती २५ हजार रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी श्रावणे यांच्या सांगण्यावरून वनरक्षक सोनटक्के याने २५ हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना रंगेहात पकडल्यानंतर वनपाल श्रावणे आणि वनरक्षक सोनटक्के या दोघांना लाचप्रकरणी अटक केली. याप्रकरणी श्रावणे व सोनटक्के यांच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणे एसीबीचे पोलीस निरीक्षक सचिन मोरे हे करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in