गणरायांना भावपूर्ण निरोप! ठाण्यात १०,२८१ गणेशमूर्तीचे विसर्जन, ढोल-ताशांचा गजर, बाप्पाच्या जयघोषात भक्तीला उधाण

अनंत चतुर्दशीच्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विसर्जनस्थळांवर भक्तिमय वातावरणात तब्बल १० हजार २८१ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये २८१ सार्वजनिक गणेशमूर्तीचा समावेश आहे.
गणरायांना भावपूर्ण निरोप! ठाण्यात १०,२८१ गणेशमूर्तीचे विसर्जन, ढोल-ताशांचा गजर, बाप्पाच्या जयघोषात भक्तीला उधाण
गणरायांना भावपूर्ण निरोप! ठाण्यात १०,२८१ गणेशमूर्तीचे विसर्जन, ढोल-ताशांचा गजर, बाप्पाच्या जयघोषात भक्तीला उधाणसंग्रहित छायाचित्र
Published on: 

दहा दिवसांच्या भक्तिमय उत्सवानंतर ठाणे, कल्याण-डोंबिवली, कर्जत मीरा-भाईंदर, वसई-विरार, नवी मुंबई आणि मुरबाड परिसरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, बाप्पाच्या जयघोषात निघालेल्या विसर्जन मिरवणुका आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विविध ठिकाणी प्रशासनाने केलेल्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडली. कृत्रिम तलाव, विसर्जन घाट, फिरते विसर्जन तलाव आणि निर्माल्य संकलन केंद्रांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक विसर्जनाला यंदाही नागरिकांनी प्रतिसाद दिला.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विसर्जनस्थळांवर भक्तिमय वातावरणात तब्बल १० हजार २८१ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये २८१ सार्वजनिक गणेशमूर्तीचा समावेश आहे. महापालिकेने केलेल्या नियोजनानुसार कृत्रिम तलाव, विशेष टाकी व्यवस्था, मूर्ती स्वीकृती केंद्र, फिरती विसर्जन व्यवस्था आणि खाडीघाट अशा विविध ठिकाणी विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

कृत्रिम तलावांमध्ये ६ हजार ८६७, खाडीघाटावर १ हजार ७४५, विशेष टाकी व्यवस्थेत १ हजार ६२२, मूर्ती स्वीकृती केंद्रात ३६ आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेत ११ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. प्रभागनिहाय पाहता उथळसर येथे २०९, नौपाडा कोपरी येथे ८३२, कळवा येथे १ हजार १८७ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. ३७९, दिवा येथे ९४७, मुंब्रा येथे २०२, माजिवडा-मानपाडा येथे २ हजार ९७१, लोकमान्य-सावरकरनगर येथे ७२, वागळे येथे २ हजार ४८२ आणि वर्तकनगर येथे १ हजार अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व विसर्जनस्थळांवर मिळून ११ हजार २०० किलो निर्माल्य संकलित करण्यात आले, तर संपूर्ण गणेशोत्सव काळात तब्बल ६१ हजार किलो निर्माल्य संकलित झाले. या निर्माल्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करण्यात येणार आहे. दीड, पाच, गौरी-गणपती, सात दिवस आणि अनंत चतुर्दशी या सर्व विसर्जनाच्या दिवसांत ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ५९ हजार ७२२ गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. महापौर शर्मिला पिंपळोळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी विसर्जन व्यवस्थेला सहकार्य केल्याबद्दल गणेशभक्तांचे आभार मानले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in