रस्तेकामासाठी जड-अवजड वाहनांना बंदी; ७ डिसेंबरपासून जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार

ठाणे-घोडबंदर राज्य महामार्गावरील घाटभागात रस्त्याच्या भौमितिक सुधारणा व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याने जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
रस्तेकामासाठी जड-अवजड वाहनांना बंदी; ७ डिसेंबरपासून जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार
रस्तेकामासाठी जड-अवजड वाहनांना बंदी; ७ डिसेंबरपासून जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणारसंग्रहित छायाचित्र
Published on

भाईदर : ठाणे-घोडबंदर राज्य महामार्गावरील घाटभागात रस्त्याच्या भौमितिक सुधारणा व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याने जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

कामकाजाच्या कालावधीत वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काशिमीरा वाहतूक शाखेच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात आले असून, काम सुरू असलेल्या ठिकाणी १० वाहतूक अधिकारी व ४५ वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येकी आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये ही तैनाती करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक) सागर इंगोले यांनी दिली. पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही सूचना लागू राहणार नाही.

मास्टिक अस्फाल्टचे काम

मीरा-भाईंदर महानगरपालिकेने दिलेल्या पत्रानुसार, ठाणे शहराकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर निरा केंद्र, काजूपाडा ते हॉटेल फाऊंटन दरम्यान घाटभागाच्या भौमितिक सुधारणेसाठी ग्राऊटिंग व मास्टिक अस्फाल्टचे काम करण्यात येणार आहे. हे काम ७डिसेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून रविवर संपूर्ण दिवस आणि पुन्हा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूककोंडी होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग तसेच घोडबंदर मार्गावरील जड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात येणार आहे.

पर्यायी मार्गांची माहिती

  • राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (पालघर-विरार बाजूकडून येणारी वाहने) शिरसाड फाटा येथून वरसावे बाजूकडे प्रवेश बंद.

    पर्यायी मार्ग : शिरसाड फाटा- पारोळ अकलोली (गणेशपुरी) अंबाडी मार्गे इच्छित स्थळी

  • राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (पालघर-वसई बाजूकडून येणारी अवजड वाहने) चिंचोटी नाक्यापासून वरसावे बाजूकडे प्रवेश बंद .

    पर्यायी मार्ग : चिंचोटी - कामन खारबांव अंजुरफाटा - भिवंडी मार्गे.

  • पश्चिम द्रुतगती मार्ग (मुंबई/काशिमीरा बाजूकडून घोडबंदर मार्गे ठाण्याकडे जाणारी वाहने) फाऊंटन हॉटेलजवळ प्रवेश बंद.

    पर्यायी मार्ग : वरसावे उड्डाणपूल गुजरात राष्ट्रीय महामार्ग -शिरसाड फाटा - पारोळ अकलोली अंबाडी मार्गे --किंवा चिंचोटी - कामन - खारबांव अंजुरफाटा भिवंडी मार्गे.

logo
marathi.freepressjournal.in