Thane : जनसुनावणी, कळवा-मुंब्रा-दिवा विस्ताराला गती; चेंदणी कोळीवाड्यासाठी इम्पॅक्ट असेसमेंट होणार, सरकारचा निर्णय

ठाण्याच्या महत्त्वाकांक्षी अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या भावना आणि स्थानिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
Thane : जनसुनावणी, कळवा-मुंब्रा-दिवा विस्ताराला गती; चेंदणी कोळीवाड्यासाठी इम्पॅक्ट असेसमेंट होणार, सरकारचा निर्णय
Thane : जनसुनावणी, कळवा-मुंब्रा-दिवा विस्ताराला गती; चेंदणी कोळीवाड्यासाठी इम्पॅक्ट असेसमेंट होणार, सरकारचा निर्णय(संग्रहित छायाचित्र)
Published on

ठाणे : ठाण्याच्या महत्त्वाकांक्षी अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांच्या भावना आणि स्थानिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रकल्पासाठी जनसुनावणी घेणे, कळवा–मुंब्रा–दिवा परिसरापर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याची प्रक्रिया सुरू करणे आणि चेंदणी कोळीवाडा तसेच जुन्या ठाणे परिसराचा स्वतंत्र इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत देण्यात आले. या निर्णयामागे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे मानले जात आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झालेल्या आमदार डावखरे यांनी मेट्रो प्रकल्पाला विरोध नसल्याचे स्पष्ट करत लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय विकास प्रकल्प राबवू नये, अशी भूमिका मांडली. नागरिकांच्या हरकती, सूचना जाणून घेण्यासाठी जनसुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली.

आवश्यक डीपीआर तयार करणार

बैठकीत डावखरे यांनी कळवा, मुंब्रा आणि दिवा या वेगाने विकसित होत असलेल्या भागांचा मूळ आराखड्यात समावेश नसल्याची बाब निदर्शनाला आणून दिली. या भागांनाही मेट्रो सेवेशी जोडण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यानंतर या विस्तारासाठी आवश्यक डीपीआर तयार असून पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश मेट्रो प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in