ठाण्यात ‘हिट अँड रन’; भरधाव मर्सिडीजने २१ वर्षीय दुचाकीस्वाराला चिरडले

दर्शन हेगडे असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव असून तो ठाण्यातील संत ज्ञानेश्वर साईकृपा सदन चाळीमध्ये राहत होता. तो आपल्या मोटारसायकलवरून चायनीज आणण्यासाठी गेला होता.
दर्शन हेगडे असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव असून तो ठाण्यातील संत ज्ञानेश्वर साईकृपा सदन चाळीमध्ये राहत होता.
दर्शन हेगडे असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव असून तो ठाण्यातील संत ज्ञानेश्वर साईकृपा सदन चाळीमध्ये राहत होता. एक्स
Published on

ठाणे : राज्यात ‘हिट अँड रन’च्या वाढत्या घटनांमुळे संताप व्यक्त होत असतानाच ठाण्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या ‘हिट अँड रन’च्या घटनेत एका आलिशान मर्सिडीज गाडीने एका २१ वर्षीय दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाजवळच ही घटना घडली असून आरोपी फरार झाला आहे.

अपघाताच्या वेळी कारची रेस सुरू होती, तसेच कार चालवणाऱ्याने मद्य प्राशन केले होते, असा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर ठाण्यात संतापाचे वातावरण आहे.

दर्शन हेगडे असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव असून तो ठाण्यातील संत ज्ञानेश्वर साईकृपा सदन चाळीमध्ये राहत होता. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास दर्शन आपल्या मोटारसायकलवरून चायनीज आणण्यासाठी वागळे इस्टेट येथे जाऊन घरी परतत असताना नितीन जंक्शन येथे नाशिक हायवेवरून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव मर्सिडीजने (क्रमांक एमएच ०२ बीके १२००) दर्शनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दर्शन जागेवरच मरण पावला. धडक दिल्यानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून तो अद्याप फरार आहे.

याप्रकरणी फिर्यादी दिशीत ठक्कर यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपच्या युवा मोर्चाच्यावतीने नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्यावर नातेवाईक ठाम

जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही, तोपर्यंत दर्शनचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय मृताच्या नातेवाईकांनी घेतला आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा कारची रेस लावण्यात आली होती. कार चालवणाऱ्यांनी मद्यप्राशन देखील केले होते. पोलिसांकडून याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. ‘नंबर प्लेट’ जागेवर मिळून आली तरी आरोपीला अटक केली जात नसल्याने मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मृताच्या भावाने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in