Thane : होळी-धुलिवंदन पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज; प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी कागदावरच ?

शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक पिशव्यांत पाणी भरून फुगे तयार करून ते रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर फेकण्याचे प्रकार विविध भागांत दिसून येत आहेत. दुपारनंतर व सायंकाळच्या सुमारास, शाळा सुटल्यानंतर काही प्रमुख रस्ते, चौक आणि वसाहती परिसरात हे प्रकार अधिक तीव्र होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
होळी-धुलिवंदन पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज; प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी कागदावरच ?
होळी-धुलिवंदन पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज; प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी कागदावरच ?'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

ठाणे : सुस्त पोलीस यंत्रणा आणि निष्क्रिय प्रशासनामुळे ठाणे शहरात होळीपूर्वीच धुळवडीचा बेरंग अनुभवायला मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. होळी सणाला अजून काही दिवस अवकाश असतानाच शहरात तथाकथित 'अ‍ॅडव्हान्स होळी'चे प्रकार वाढले असून, यामुळे सार्वजनिक सुरक्षितता आणि पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक पिशव्यांत पाणी भरून फुगे तयार करून ते रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर फेकण्याचे प्रकार विविध भागांत दिसून येत आहेत. दुपारनंतर व सायंकाळच्या सुमारास, शाळा सुटल्यानंतर काही प्रमुख रस्ते, चौक आणि वसाहती परिसरात हे प्रकार अधिक तीव्र होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, ठाणे महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेली असतानाही शहरातील काही दुकाने या पिशव्या खुलेआम विक्री करत केवळ असल्याचे चित्र आहे. अत्यल्प दरात मोठ्या प्रमाणात पिशव्या उपलब्ध होत असल्याने नियमांची अंमलबजावणी कागदापुरतीच राहिली आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

होळी सण आनंदाचा आहे; मात्र प्लास्टिक पिशव्यांत पाणी भरून फुगे फेकणे हा आनंद नसून पर्यावरणाचा अपमान आहे. बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर हा कायद्यालाही धक्का देणारा आहे. पाणी वाचवा, प्लास्टिक टाळा आणि पर्यावरणपूरक पद्धतीनेच सण साजरा करा.

डॉ. प्रमोद साळसकर, पर्यावरण अभ्यासक

रंगपंचमी साजरी करताना रासायनिक रंगांचा वापर टाळावा. अशा रंगांमुळे त्वचा, डोळे आणि श्वसनसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. नैसर्गिक रंगांचा वापर करा. कोणताही त्रास किंवा अ‍ॅलर्जी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.

डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक

नैसर्गिक रंगांनीच होळी साजरी करण्याचा सल्ला

ठाणे : होळी हा रंगांचा उत्सव असला तरी रासायनिक रंगांच्या अतिरेकामुळे आनंदाचा रंग बेरंग होण्याची शक्यता अधिक असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. रंगांची उधळण, आनंद आणि उत्साहाने साजरी होणारी रंगपंचमी ही सामाजिक एकोप्याची परंपरा असली, तरी सण साजरा करताना आरोग्य आणि पर्यावरणाची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील बाजारपेठांमध्ये विविध रंगांची विक्री वाढली असली, तरी त्यामध्ये रासायनिक घटकांचे प्रमाण अधिक असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in