Thane : जोगिला तलावात पडून दोघींचा मृत्यू; खेळताना तलावात पडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या दोन चिमुकलींचे मृतदेह शुक्रवारी सकाळी उथळसर नाका परिसरातील जोगिला तलावात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. खेळताना तलावात पडून दोघींचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Thane : जोगिला तलावात पडून दोघींचा मृत्यू; खेळताना तलावात पडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
Thane : जोगिला तलावात पडून दोघींचा मृत्यू; खेळताना तलावात पडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाजप्रातिनिधिक छायाचित्र | wikimedia
Published on: 

ठाणे : गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या दोन चिमुकलींचे मृतदेह शुक्रवारी सकाळी उथळसर नाका परिसरातील जोगिला तलावात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. खेळताना तलावात पडून दोघींचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गंगी उदय कामी (७) आणि आशा गणेश कामी (४) अशी मृत मुलींची नावे आहेत. दोघी आंबेडकर रोडवरील खोपट सिग्नलजवळील लॉरिस्टॅन्ड चाळीत राहत होत्या. गुरुवारी त्या त्यांच्या पाच वर्षीय भावासोबत प्रभाग समिती कार्यालयाजवळील पालिका शाळेपर्यंत गेल्या होत्या. भाऊ शाळेत गेल्यानंतर दोघी घरी जाण्यासाठी निघाल्या; मात्र घरी परतल्या नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू होता.

शुक्रवारी सकाळी १०.४८ वाजता जोगिला तलावात दोन मुलींचे मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. राबोडी पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी तलावातून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी प्रथम ठाणे जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी दिली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in