Thane : रिक्षाच्या पैशावरून वाद विकोपाला; कळव्यातील मारहाणीत रिक्षाचालकाचा मृत्यू

रिक्षाच्या पैशाच्या वादावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान हिंसक मारहाणीत होऊन बाबासाहेब रघुनाथ जानराव (४३) रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना कळवा पूर्वेतील आतकोनेश्वरनगर परिसरात उघडकीस आली आहे.
Thane : रिक्षाच्या पैशावरून वाद विकोपाला; कळव्यातील मारहाणीत रिक्षाचालकाचा मृत्यू
Thane : रिक्षाच्या पैशावरून वाद विकोपाला; कळव्यातील मारहाणीत रिक्षाचालकाचा मृत्यू'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

ठाणे : रिक्षाच्या पैशाच्या वादावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान हिंसक मारहाणीत होऊन बाबासाहेब रघुनाथ जानराव (४३) रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना कळवा पूर्वेतील आतकोनेश्वरनगर परिसरात उघडकीस आली आहे.

रिक्षामालक दिनेश घाडी आणि प्रेम राजपूत यांनी केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी कळवा पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Thane : रिक्षाच्या पैशावरून वाद विकोपाला; कळव्यातील मारहाणीत रिक्षाचालकाचा मृत्यू
Bengaluru Mass Murder : कॅब चालकाचे भयंकर कृत्य; पत्नीसह सासरच्या सहा जणांची वरवंट्याने ठेचून निर्घृण हत्या

बाबासाहेब जानराव भाडेतत्त्वावर रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होते. रिक्षाच्या भाड्यावरून त्यांचा रिक्षामालक दिनेश घाडी याच्याशी वाद झाला. यावेळी घाडीसोबत प्रेम राजपूत हाही उपस्थित होता. वादानंतर तिघेही घराबाहेर गेल्याचे बाबासाहेब यांच्या भावजय सुनीता जानराव यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)