
मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कोपरी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आले. या पुलाचा खर्च हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए कडून करण्यात आला असून रेल्वे मार्गिकांवरील भागाचे काम मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले आहे. या पुलामुळे ठाण्यातील होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असून ठाण्यासह घोडबंदर, भिवंडी, नाशिक, कल्याण -डोंबिवलीमधील प्रवाश्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाची लांबी ७८४ मीटर तर रुंदी ३७.०४ मीटर इतकी आहे. आधी हा पूल २ + २ मार्गिकांचा होता. अरुंग असलेल्या या पुलामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या मार्गिकेचे ४ + ४ असे रुंदीकरण करण्याचे काम प्राधिकरणामार्फत घेण्यात आले. या प्रकल्पामध्ये नौपाडा जंक्शन ते ज्ञानसाधना कॉलेजपर्यंत महामार्गाखालून वाहानांच्या रहदारीकरीता 2+2 मार्गिकांचा 40 मीटर लांब आणि 21.2 मीटर रुंद भुयारी मार्ग देखील बांधण्यात आला.