ठाणे जिल्ह्यातील ३६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे; प्रत्येक मतदारसंघात महिला मतदान केंद्र

राज्यात यावेळी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील.
ठाणे जिल्ह्यातील ३६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे; प्रत्येक मतदारसंघात महिला मतदान केंद्र

ठाणे : ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ३६ मतदान केंद्राचे नियंत्रण हे महिलांकडे असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून प्रत्येक मतदारसंघात महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र अशी यामागची संकल्पना आहे. मतदान प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी महिला नियंत्रित मतदान केंद्र ही संकल्पना पुढे आली असून संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.

राज्यात यावेळी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार आहेत. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी या महिलाच असणार आहेत. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांपैकी सर्वाधिक ३६ मतदान केंद्रे ही महिलांना नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया हाताळण्यापासून ते मतदान केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यापासून महिलांचा सहभाग मोठा असणार आहे, एवढे मात्र निश्चित झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in