Thane : रुग्णवाहिकेच्या मनमानी भाड्याचा खेळ थांबणार; दरपत्रक लावणे बंधनकारक

रुग्णवाहिका सेवेत पारदर्शकता निर्माण करून नागरिकांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), ठाणे आणि ठाणे जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्ह्यातील खासगी रुग्णवाहिका चालक-मालकांना शासनाने निश्चित केलेल्या अधिकृत दरपत्रकाचे वितरण करण्यात आले.
Thane : रुग्णवाहिकेच्या मनमानी भाड्याचा खेळ थांबणार; दरपत्रक लावणे बंधनकारक
Thane : रुग्णवाहिकेच्या मनमानी भाड्याचा खेळ थांबणार; दरपत्रक लावणे बंधनकारक'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

ठाणे : रुग्णवाहिका सेवेत पारदर्शकता निर्माण करून नागरिकांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), ठाणे आणि ठाणे जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जिल्ह्यातील खासगी रुग्णवाहिका चालक-मालकांना शासनाने निश्चित केलेल्या अधिकृत दरपत्रकाचे वितरण करण्यात आले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार रुग्णवाहिका सेवेसाठी अधिकृत दर निश्चित करण्यात आले असून, प्रत्येक खासगी रुग्णवाहिकेमध्ये हे दरपत्रक ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिका सेवेसाठी आकारण्यात येणारे अधिकृत शुल्क सहज समजणार असून, अवाजवी दर आकारण्याच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

शुक्रवारी रुग्णवाहिकांमध्ये शासकीय दरपत्रक लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, जिल्हा दंत चिकित्सक डॉ. अर्चना पवार, मनसे नेते अविनाश जाधव, अभिजित पानसे, नैनेश पाटणकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णवाहिकांमध्ये हे दरपत्रक लावण्यात येणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णवाहिकांसाठी शासकीय दरपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे रुग्णवाहिका सेवेत पारदर्शकता वाढेल, नागरिकांना शासकीय दरांची माहिती सहज उपलब्ध होईल आणि अवाजवी शुल्क आकारण्याच्या प्रकारांना आळा बसेल. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवरील आर्थिक तसेच मानसिक ताण कमी होण्यास निश्चितच मदत होईल. शासकीय दरपत्रकाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन सर्व रुग्णवाहिका चालक व मालकांना करण्यात येत आहे.

हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

logo
marathi.freepressjournal.in