Thane : ठाण्यात मेट्रोचे काम सुरु असताना मोठा अपघात ; पादचारी महिलेचा मृत्यू

ठाण्यातील (Thane) विवियाना मॉलजवळ झालेल्या सुरु असलेल्या मेट्रो लाईनचे काम सुरु असताना घडला अपघात
Thane : ठाण्यात मेट्रोचे काम सुरु असताना मोठा अपघात ; पादचारी महिलेचा मृत्यू
Published on

ठाण्यामध्ये (Thane) मुंबई मेट्रोचे काम सुरु आहे. आज विवियाना मॉलच्या परिसरात असणाऱ्या उत्सव हॉटेलजवळ मेट्रो-४ (Metro 4) प्रकल्पाचे बांधकाम सुरु असताना झालेल्या अपघातात एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला. ही महिला रस्ता ओलांडत असताना मेट्रो प्रकल्पाच्या गर्डरची लोखंडी प्लेट खाली कोसळली. ती लोखंडी प्लेट जड असल्यामुळे महिला त्याखाली आली जागीच अंत झाला. सुनीता कांबळे असे या मृत महिलेचे नाव असून त्या ३७ वर्षांच्या होत्या. घटनास्थळी मेट्रोचे कर्मचारी आणि राबोडी पोलीस दाखल झाले होते.

ठाण्यात वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चारच्या मार्गिकेचे काम सुरू आहे. हा अपघात कसा झाला? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघात झाल्यानंतर राबोडी पोलीस कर्मचारी तिथे पोहचले असून सध्या ते पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटना झाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. दोघांनी मिळून त्या महिलेचा मृतदेह बाहेर काढला. तिला ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मात्र, यामुळे पुन्हा एकदा मेट्रोचे काम आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उभा राहिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in