
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात रात्री बाराच्या आधी अवजड वाहनांची ये-जा होऊ नये, असा स्पष्ट आदेश दिला आहे. मात्र तरीही शहरातील काही भागांत अवजड वाहनांची वर्दळ सुरूच असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक रूप धारण करत प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे.
जाधव म्हणाले, उपमुख्यमंत्र्यांचा आदेश आम्ही मनापासून पाळू. जर रात्री बाराच्या आधी ठाणे शहरात अवजड वाहने फिरताना दिसली, तर ती वाहने आम्ही फोडून टाकू, वाहतुकीचे नियम पाळले गेले पाहिजेत, अन्यथा आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराच दिला आहे.
ठाण्यातील वाहतूककोंडीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन हा इशारा देण्यात आला आहे.
मनसेच्या या भूमिकेमुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर कठोर अंमलबजावणीसाठी दबाव वाढला आहे.