ठाणे-मुंब्र्यातून सहा जण बेपत्ता

कापूरबावडी, कोपरी, वर्तकनगर आणि मुंब्रा परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जण बेपत्ता झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये तीन महिला, एक तरुणी आणि दोन पुरुषांचा समावेश असून संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ठाणे-मुंब्र्यातून सहा जण बेपत्ता
ठाणे-मुंब्र्यातून सहा जण बेपत्ताप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : कापूरबावडी, कोपरी, वर्तकनगर आणि मुंब्रा परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जण बेपत्ता झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये तीन महिला, एक तरुणी आणि दोन पुरुषांचा समावेश असून संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कापूरबावडी परिसरातील २४ वर्षीय महिला २० सप्टेंबर रोजी कामावर गेल्यानंतर घरी परतली नाही. मोबाईल बंद असल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. कोपरीतील ४५ वर्षीय महिला घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली.

मुंब्रा येथील २३ वर्षीय तरुणी गुलाबपार्क मार्केटमध्ये कुटुंबीयांसोबत खरेदीसाठी गेली असताना गर्दीतून बेपत्ता झाली. तसेच ३७ वर्षीय पुरुष पत्नीशी झालेल्या वादानंतर घरातून निघून गेला. मुंब्र्यातील आणखी एक ३२ वर्षीय महिला घराघरांत भांडी विक्रीच्या व्यवसायासाठी गेल्यानंतर परतली नाही. वर्तकनगर येथील ४४ वर्षीय जितेंद्र हे कौटुंबिक वादानंतर बेपत्ता झाले. त्यांनी कुटुंबीयांना फोन करून ‘मी आता येणार नाही’, असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या सर्व प्रकरणांचा तपास सुरू असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, नातेवाईक व परिचितांकडून मिळणारी माहिती आणि संबंधित परिसरातील हालचालींची तपासणी केली जात आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in