ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर कारवाई

कळवा प्रभाग समिती क्षेत्रात, जुना मुंबई पुणे रोड येथील सुमारे १६०० चौ.फुटाचे आरसीसी प्लिंथचे बांधकाम पूर्णत: निष्कासित करण्यात आले.
ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर कारवाई

ठाणे : ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात सुरू केलेल्या कारवाईत गुरुवारी दिवा, मुंब्रा, कळवा आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या क्षेत्रात बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. नेताजी कम्पाऊंड, आचार गल्ली, दिवा पूर्व मुंब्रा देवी कॉलनी, आयडियल मार्केट, ठामपा उद्यानालगत, मुंब्रा, जुना मुंबई-पुणे रोड, कोलशेत वरचा गाव, सिद्धार्थनगर माजिवडा गाव येथील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.

अनधिकृत बांधकामांना थारा न देण्याचे धोरण ठाणे महापालिकेने स्वीकारले असून अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. या कारवाईत, दिवा प्रभाग समितीतील नेताजी कम्पाऊंड येथे तळ अधिक तीन मजल्याचे सुमारे २५०० चौ. फुटाचे आर.सी.सी पूर्णत: जमीनदोस्त करण्यात आले. त्याच भागात सुमारे ३००० चौ. फुटांचे आरसीसी प्लिंथचे बांधकाम पूर्णत: निष्कसित आले. सुफा हाईटसमोर आचार गल्ली येथील साधारणपणे ६००० चौ.फुटाचे तसेच ३०००चौ. फुटाचे अशी दोन आर.सी.सी प्लिंथची बांधकामे पूर्णत: निष्कासित करण्यात आली.

याच प्रभाग समितीतील मुंब्रा देवी कॉलनी येथील प्रभाग क्र. २७ मध्ये आदर्श स्कूलसमोर दिवा शिळ रोड येथील २५०० चौ.फुटाचे, दत्त मंदिराच्या बाजूला प्रभाग क्र. २८ मधील साधारणत: ३००० चौ. फुटाचे, मुंब्रा देवी कॉलनी येथील साधारणत: ३००० चौ. फुटाचे तसेच दळवी नगर दातिवली स्मशानभूमी जवळील साधारणत: २८०० चौ. फुटाचे आरसीसी प्लिंथचे बांधकाम पूर्णत: निष्कसित करण्यात आले. तसेच मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील आयडियल मार्केट येथील तळ अधिक एक मजली साधारण ३००० चौ. फूट क्षेत्र असलेले आरसीसी बांधकाम पूर्णत: निष्कसित करण्यात आले.

कळवा प्रभाग समिती क्षेत्रात, जुना मुंबई पुणे रोड येथील सुमारे १६०० चौ.फुटाचे आरसीसी प्लिंथचे बांधकाम पूर्णत: निष्कासित करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in