ठाणे महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर धडक मोहीम सुरू

ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे
ठाणे महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर धडक मोहीम सुरू
Published on

ठाणे महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहीम सुरू असून मंगळवारी माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.

माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सुरज वॉटर पार्कलगतच्या सेवा रस्त्यावर अचल वाहनांवर होर्डींग साठीचे अंदाजे ३० x २० चौ. फुट मोजमापाचे उभारण्यात आलेले अनधिकृत लोखंडी फॅब्रिकेशन गॅस कटरच्या सहाय्याने कट करण्यात आले. ब्रम्हांड येथील अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले शौचालयाचे बांधकाम तोडून येथील विटांचे रेबिट जेसीबी मशिन व मनुष्यबळाच्या सहाय्याने हटविण्यात आले. तसेच नमिता पांडे, मनोरमानगर यांचे वाणिज्य १२ X १५ चौ. फुट मोजमापाची २ अनधिकृत बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आलीत.

सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, उपआयुक्त परिमंडळ-३ दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या साहाय्याने पोलीस बंदोबस्तात केली.

logo
marathi.freepressjournal.in