Thane : नगरसेवकांना निवृत्तीवेतन द्यावे; माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची सूचना; सोमवारच्या महासभेत येणार चर्चेला

आमदार, खासदारांप्रमाणेच ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन (पेन्शन) योजना लागू करावी, अशी मागणी पुढे आली आहे. जे नगरसेवक सलग दोन वेळा निवडून आले असतील त्यांना ही योजना लागू करावी, अशी प्रस्तावाची सूचना माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मांडल्यानंतर येत्या सोमवारी होणाऱ्या महासभेत चर्चेसाठी येणार आहे.
Thane : नगरसेवकांना निवृत्तीवेतन द्यावे; माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची सूचना; सोमवारच्या महासभेत येणार चर्चेला
Published on

ठाणे : आमदार, खासदारांप्रमाणेच ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन (पेन्शन) योजना लागू करावी, अशी मागणी पुढे आली आहे. जे नगरसेवक सलग दोन वेळा निवडून आले असतील त्यांना ही योजना लागू करावी, अशी प्रस्तावाची सूचना माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मांडल्यानंतर येत्या सोमवारी होणाऱ्या महासभेत चर्चेसाठी येणार आहे. लोकप्रतिनिधींच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने हा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे.

सदर प्रस्तावाचा संदर्भ १ सप्टेंबर २०१७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यांना महापौर कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या पत्राशी संबंधित असून, त्यानुसार माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन लागू करण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आलेली होती. आता या मागणीला पुन्हा एकदा गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठाणे महापालिकेतील नगरसेवक हे आपल्या प्रभागातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. अनेक नगरसेवक सलग दोन किंवा तीन कार्यकाळ निवडून येत असल्याचे दिसून येते, जे त्यांच्या कायार्ची नागरिकांकडून मिळालेली पावती मानली जाते. मात्र, या सेवेसाठी त्यांना नियमित पगार किंवा निवृत्तीनंतर आर्थिक हमी उपलब्ध नसते.

प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे की, अनेक नगरसेवक पूर्णवेळ सार्वजनिक कामात गुंतलेले असल्यामुळे त्यांच्या इतर उत्पन्नाच्या संधी मर्यादित होतात. अनेक वेळा नागरिकांच्या समस्या सोडविताना स्वतःच्या खचातून कामे पूर्ण करावी लागतात.

अशा परिस्थितीत निवृत्तीनंतर त्यांना आर्थिक सहाय्य म्हणून निवृत्ती वेतन देणे आवश्यक असल्याचे मत या प्रस्तावाच्या सूचनेत मांडण्यात आले आहे. यासोबतच, काही राज्यांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद असल्याचा उल्लेख प्रस्तावात करण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेतही अशा प्रकारची योजना राबविण्यासाठी सविस्तर धोरण (पॉलिसी) तयार करून शासनाची मान्यता घेणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर प्रस्ताव आगामी सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहे. या निर्णयाकडे ठाणे शहरातील राजकीय व प्रशासकीय वतुर्काचे लक्ष लागले आहे.

नगरसेवकांसाठी अधिकृत ओळख बॅच

ठाणे महानगरपालिकेतील सर्व नगरसेवक व नगरसेविकांना अधिकृत ओळख म्हणून महापालिकेचा लोगो असलेला बॅच उपलब्ध करून द्यावा, अशी प्रस्तावाची सूचना भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी महासभेत मांडली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालय धर्तीवर आमदारांना दिल्या जाणाऱ्या अधिकृत बॅचप्रमाणेच ही संकल्पना राबवली जावी, असे त्यांनी नमूद केले आहे. ठाणे महापालिकेमध्ये सध्या एकूण १३१ नगरसेवक/नगरसेविका कार्यरत आहेत. या बॅचवर ठाणे महानगरपालिकेचा अधिकृत लोगो असणार असून, त्याद्वारे नगरसेवकांची अधिकृत ओळख सुलभ होणार आहे.

किमान दोन कार्यकाळ पूर्ण करण्याची अट

प्रस्तावामध्ये निवृत्ती वेतनासाठी किमान दोन कार्यकाळ पूर्ण केलेल्या नगरसेवकांनाच या योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, महापालिकेच्या आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेऊनच या योजनेची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. या योजनेमुळे अनुभवी व सक्षम व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्यास प्रोत्साहन मिळेल, तसेच सामाजिक कायार्ला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in