ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२

ठाणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये अवघ्या काही दिवसांत फेरबदल करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२
ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२(संग्रहित छायाचित्र)
Published on

ठाणे : ठाणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये अवघ्या काही दिवसांत फेरबदल करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कामकाजाची नव्याने विभागणी करत प्रशांत रोडे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त-१, तर डॉ. नितीन राठोड यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त-२ची जबाबदारी सोपविली आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मनीष जोशी यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या पदावर डॉ. राठोड यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली. नगरविकास विभागाने ४ सप्टेंबर रोजी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढला होता. डॉ. राठोड हे यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ. राठोड यांनी काही दिवसांपूर्वीच अतिरिक्त आयुक्त-१चा कार्यभार स्वीकारला होता. मात्र, आता त्यांच्या जबाबदारीत बदल करण्यात आला आहे. महापालिकेच्या विविध विभागांचे कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडणे, प्रशासकीय निर्णयांची अंमलबजावणी गतिमान करणे आणि कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही कामकाज विभागणी करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, अल्पावधीतच अतिरिक्त आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये झालेल्या या फेरबदलामुळे महापालिका वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in