ठाणे महापालिकेने अनधिकृत बारवर केली कारवाई

ठाणे महापालिकेने अनधिकृत  बारवर केली कारवाई

ठाणे शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरू असून यामध्ये बार, हॉटेल, डान्स बारमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. ठाणे महापालिकेने गुरुवारी उपवन येथील सूर संगीत डान्सबार वर अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवत कारवाई केली. त्यानंतर अनधकिृत बार पालिकेच्या रडारवर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

उपवन येथील बारमध्ये तळमजल्याचा वापर करण्यात आला असल्याची तक्रार पालिकेच्या अतिक्रमण विभागाला प्राप्त झाली असल्याने पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार अतिक्रमण उपायुक्त गोधेपुरे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि सचिन बोरसे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तळघर सील करण्यात आले.

ठाणे महानगर पालिका हद्दीत काही ठिकाणी वाणिज्य परवाना नसताना अनधिकृतरित्या हॉटेल आणि बार सुरू आहेत. विविध प्रकारचे जवळपास हजारो बार पालिका हद्दीत आहेत. अश्ाा बारवर कारवाईची मागणी अनेक वेळा करण्यात आली होती. दरम्यान अनेक तक्रारी देखील पालिकेच्या अतिक्रमण विभागाला प्राप्त झाल्या असून ही माेहीम तीव्र करणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे गोदापुरे यांनी दिली. ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपल्या कारकिर्दीत अनधिकृत बार, हॉटेल, लोजिंग बोर्डिंग, डान्स बारवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला होता, त्यांनतर ही कारवाई थंड पडली होती. मात्र त्याला आता पुन्हा चालना मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in