Thane : महापालिकेतील अधिकारी होणार हायटेक; AI चे घेतले जात आहे प्रशिक्षण

ठाणे महापालिकेतील कर्मचारी, अधिकारी वर्ग सध्या टप्प्याटप्प्याने अत्याधुनिक स्वरूपातील एआयचे ऑनलाइन प्रशिक्षण घेत आहेत. ठाणे महापालिकेतील कागदोपत्री होणाऱ्या कारभाराला योग्य वळण लागावे, निविदेतील त्रुटी दूर व्हाव्यात व इतर कामांसाठी सध्या हे प्रशिक्षण फायदेशीर ठरत असल्याची माहिती समोर आली आहे.
Thane : महापालिकेतील अधिकारी होणार हायटेक; AI चे घेतले जात आहे प्रशिक्षण
Published on

ठाणे : ठाणे महापालिकेतील कर्मचारी, अधिकारी वर्ग सध्या टप्प्याटप्प्याने अत्याधुनिक स्वरूपातील एआयचे ऑनलाइन प्रशिक्षण घेत आहेत. ठाणे महापालिकेतील कागदोपत्री होणाऱ्या कारभाराला योग्य वळण लागावे, निविदेतील त्रुटी दूर व्हाव्यात व इतर कामांसाठी सध्या हे प्रशिक्षण फायदेशीर ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या टप्यात वरिष्ठ अधिकारी आणि त्यानंतर इतर अधिकारी प्रशिक्षण घेत आहेत.

महापालिका ठाणे आधुनिकतेकडे कूच करण्यासाठी प्रयत्नशील आहे. एक्स, फेसबुक, इन्स्टापाठोपाठ आता एआयचे प्रशिक्षण अधिकारी घेत आहेत. त्यानुसार महिन्यांपासून याचे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण एक आठवडा, १५ दिवस ते एक महिन्याचेही असल्याची मागील काही माहिती ठाणे महापालिकेतील वरिष्ठ एकधिकान्यास दिली आहे. महापालिकेतील कामांमध्ये अचूकता यावी, पारदर्शपणे काम व्हावे, निविदेतील चुका सुधारण्यासाठी, व्याकरणातील चुका न होण्यासह इतर कामांसाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरत असल्याचे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in